भोस्ते घाट वळणावरील गतिरोधक कुचकामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोस्ते घाट वळणावरील गतिरोधक कुचकामी
भोस्ते घाट वळणावरील गतिरोधक कुचकामी

भोस्ते घाट वळणावरील गतिरोधक कुचकामी

sakal_logo
By

rat27p31.jpg
71341
खेडः भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघातामुळे संरक्षक भिंतीसह वाहनाचे नुकसान होऊ नये यासाठी लावण्यात आलेले टायर.
-------------
भोस्ते घाटातील गतिरोधक कुचकामी
राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष ; ठोस उपाययोजनेऐवजी केवळ मलमपट्टी
खेड, ता. २७ः मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी दोन गतिरोधक वाढवले आहेत. मात्र, तरीदेखील घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे अवघड वळणावरील गतिरोधक कुचकामीच ठरत असून, राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून ठोस उपाययोजनांऐवजी मलमपट्टीच करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अपघातांची मालिका कायमच आहे.
भोस्ते घाटातील अवघड वळणावर आजपर्यंत जीवघेणे अपघात घडले आहेत. घाट उतरत असताना वाहनचालकांचे नियंत्रण सुटून वाहने थेट समोरील संरक्षक भिंतीवर आदळून अपघात घडत आहेत. विशेषतः मालवाहू ट्रकचे अपघात सातत्याने घडत असून मोठी हानीदेखील होत आहे. या अपघातात आजवर अनेक ट्रकचालक जायबंदी झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी वळणावर १० गतिरोधक बसवले आहेत; मात्र अपघातांचे सत्र सुरूच असल्याने आणखी दोन गतिरोधक वाढवण्यात आले. तरीही अपघातांचे सत्र थांबत नाही. घाट उतरत असताना अवजड वाहने वळणावरच उलटत आहेत. अपघातग्रस्त वाहने ज्या संरक्षक भिंतीवर आदळतात त्या भिंतीवर जुने टायर लावून संरक्षक भिंतीला धोका पोहचू नये या कारणासाठी ठेकेदाराने काळजी घेतली आहे. या भोस्ते घाटात घाट उतरणाऱ्या वाहनांचा वेग कमी होण्यासाठी गतिरोधक बसवले आहेत; मात्र ते कुचकामीच ठरत आहेत. या वळणावर गेल्या महिनाभरात आठ ते दहा अपघात झाले आहेत.
---------
कोट
भोस्ते घाटात चौपदरीकरण करताना हे वळण काढणे गरजेचे होते. मात्र ठेकेदाराने केवळ रुंदीकरण केले आणि संरक्षक भिंती घालून काम पूर्ण केले. मात्र या वळणावर अनेक अपघात होत असल्याने येथे ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- उत्तमकुमार जैन, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक