सहकार पॅनेलच्या विरोधात परिवर्तन पॅनेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार पॅनेलच्या विरोधात परिवर्तन पॅनेल
सहकार पॅनेलच्या विरोधात परिवर्तन पॅनेल

सहकार पॅनेलच्या विरोधात परिवर्तन पॅनेल

sakal_logo
By

राजापूर अर्बन बॅंक निवडणूक--लोगो

‘सहकार’ विरोधात ‘परिवर्तन’ रिंगणात
खलिफे, लाड ; काँग्रेस, शिवसेना एकत्र, आज उमेदवारांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ः परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून राजापूर अर्बन बँकेच्या निवडणूक आखाड्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना समविचारी लोकांसमवेत उतरणार असल्याची माहिती माजी आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यमान सहकार पॅनेल सर्वपक्षीय नसून या पॅनेलशी काँग्रेस आणि शिवसेनेचा संबंध नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. परिवर्तन पॅनेल विजयी होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करताना पॅनेलच्या उमेदवारांची बुधवारी (ता. २८) घोषणा करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, माजी नगरसेवक विनय गुरव, शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष हातणकर, पाचलचे माजी सरपंच किशोर नारकर आदी उपस्थित होते. राजापूर अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात झाली आहे. बॅंकेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये विद्यमान संचालक मंडळ असलेले सहकार पॅनेल रिंगणामध्ये उतरले आहे. त्यांच्या विरोधात आता काँग्रेस आणि शिवसेना परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. परिवर्तन पॅनेलच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. राजापूर अर्बन बँकेमध्ये सभासदांना परिवर्तन अपेक्षित असून त्याच्यातून सभासद आपले मतदान परिवर्तन पॅनेलच्या पारड्यात टाकून विजयी करतील, असा विश्‍वास माजी आमदार खलिफे, लाड आणि कुवळेकर यांनी व्यक्त केला. सहकार पॅनेलने सर्वपक्षीय सहकार पॅनेल असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, ज्यांना आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे ती आम्हाला मान्य नसून त्यांचा आमच्या पक्षांशी काहीही संबध नसल्याचे स्पष्टीकरण पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर खलिफे व कुवळेकर यांनी दिले.