डामरेतील सदस्य शिवसेनेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डामरेतील सदस्य शिवसेनेत
डामरेतील सदस्य शिवसेनेत

डामरेतील सदस्य शिवसेनेत

sakal_logo
By

71258
कणकवली ः डामरे येथील सदस्याचे स्वागत करताना सतीश सावंत.

डामरेतील सदस्य शिवसेनेत
कणकवली ः नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डामरे येथील बिनविरोध सदस्य विष्णू जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेत सतीश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंगेश सावंत, शैलेश कानडे, साईराज नानचे, प्रिया नानचे, संतोष पारकर, वासुदेव पारकर, विजय सावंत, डिगंबर जाधव, अशोक जाधव, अविनाश जाधव, सिद्धरज दळवी, मानसी जाधव, मंगेश जाधव, सुविधा जाधव, विलास जाधव, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. डामरे येथे थेट लढतील भाजप पुरस्कृत सरपंच निवडून आले होते. शिवसेना पुरस्कृत तीन सदस्य निवडून आल्याने आता पॅनलच्या सदस्यांची संख्या चार झाली आहे.
---
तुळस-खरीवाडा येथे डान्स स्पर्धा
वेंगुर्ले ः वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत सलग ९ व्या वर्षी ८ जानेवारीला सायंकाळी साडेसहाला श्री वेताळ मंदिर तुळस खरीवाडा येथे खुल्या गटांसाठी वेस्टर्न डान्स स्पर्धा, क्लासिकल डान्स स्पर्धा व लावणी नृत्य स्पर्धा अशा तीन प्रकारात सोलो डान्स स्पर्धेचे आणि खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. या तिन्ही सोलो डान्स स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख १०००, ७००, ५०० रुपये, प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय आणि तृतीयसाठी चषक व प्रमाणपत्र व सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख रुपये ५५५५, ३३३३, २२२२ आणि चषक व प्रमाणपत्र देऊनं गौरविण्यात येईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी गुरुदास तिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.