रत्नागिरी ः मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी 155 कोटी निधी प्राप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी 155 कोटी निधी प्राप्त
रत्नागिरी ः मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी 155 कोटी निधी प्राप्त

रत्नागिरी ः मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी 155 कोटी निधी प्राप्त

sakal_logo
By

rat२७p४२.jpg
७१४२२
रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर चौपदरीकरणामध्ये येणारा रस्ता.
-----
मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी १५५ कोटी
लवकरच वाटप ; नव्या वर्षात महामार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता
रत्नागिरी, ता. २७ ः मिऱ्या- नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी जागा मालकांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यासाठी सुमारे १५५ कोटींचा निधी रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आहे. लवकरच या निधीचे वाटप जागा मालकांना करण्यात येणार आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील मिऱ्या ते आंबा (रत्नागिरी हद्द) या मार्गावरील एकूण २८ गावातील ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. जागामालकांना मोबदला देण्यासाठी एकूण ७६० कोटींची आवश्यकता होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ४९७ कोटीचा निधी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला होता. त्यातील ४७६ कोटीच्या निधीचे २४ गावातील जागामालकांना वाटप करण्यात आले होते तर त्या निधीमधील २१ कोटी रुपये उपविभागीय कार्यालयाकडे शिल्लक होते.
२० डिसेंबर २०२२ ला पुन्हा १५५ कोटीचा निधी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. यापूर्वीचे २१ कोटी धरून एकूण १७६ कोटी सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध झाले आहे. त्यातून एकूण २४ गावातील मोबदला वाटप पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित ४ गावांच्या मोबदला वाटपासाठी ११० कोटीची आवश्यकता आहे. तो निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या १७६ कोटीच्या निधीचे वाटप करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार गावनिहाय निधीचे वाटप केले जाईल. नव्या वर्षात जागामालकांना मोबदला वाटप करण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्षात मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरवात होणार आहे.