म्हापण उपसरपंचपदी ठाकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हापण उपसरपंचपदी ठाकूर
म्हापण उपसरपंचपदी ठाकूर

म्हापण उपसरपंचपदी ठाकूर

sakal_logo
By

71437
म्हापण ः उपसरपंचपदी निव़़डून आलेले भाजपचे श्रीकृष्ण ठाकूर यांच्यासमवेत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आनंद गावडे आदी.

म्हापण उपसरपंचपदी ठाकूर
कुडाळ ः म्हापण ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये आनंद गावडे यांनी आपली चाणक्य रणनीती वापरून म्हापण ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर यांना विराजमान केले. गावडे यांनी प्रथम जय हनुमान गाव विकास पॅनल मळई हे स्वतंत्र पॅनेल काढत समोर दोन पॅनेलचे तगडे आव्हान असताना देखील प्रभाग २ मधून आपले तिन्ही उमेदवार बहुमताने निवडून आणले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरले. त्यामुळे उपसरपंच निवडीला रंगत आली; परंतु गावडे यांनी आपली चाणक्य रणनीती आखत आपलाच उमेदवार उपसरपंचपदी बसावा, यासाठी निवडून आलेले श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर यांची जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. यावेळी चंद्रकांत उर्फ भाई घाडी, बाळा राऊळ, खवणे शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी वसंत तांडेल, तालुका पदाधिकारी बाबली वायंगणकर, ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य, गुरुप्रसाद चव्हाण, सीया मार्गी आदी उपस्थित होते.