Sun, Jan 29, 2023

पर्यटकांच्या मोटारीस
धामापूरमध्ये अपघात
पर्यटकांच्या मोटारीस धामापूरमध्ये अपघात
Published on : 27 December 2022, 3:29 am
71484
धामापूर ः अपघातग्रस्त मोटार.
पर्यटकांच्या मोटारीस
धामापूरमध्ये अपघात
मालवण, ता. २७ : नागपूर येथून मालवण येथे आलेले पर्यटक गोव्याला जात असताना धामापूर येथील तीव्र वळणांच्या उतारावर चालकाचा मोटारीवरील (क्रमांक एमएच ०२ ईझेड १३०८) ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाहेर जात सुमारे २० फूट खोल कोसळली. हा अपघात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडला. सुदैवाने या परिसरात झाडे, वेली असल्याने मोटार जोरात आदळली नाही. त्यामुळे आतील तिन्ही पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली. झाडाला आदळल्याने मोटारीचे मात्र मोठे नुकसान झाले. वाहतूक पोलिस दीपक तारी, शैलेश सोन्सूरकर यांनी अपघातस्थळी धाव घेत पाहणी केली. विनोद सांडव, बाबू तोरसकर, सिद्धेश परब आणि स्थानिक तरुणांनी मदतकार्य केले.