वन्यप्राण्यांपासून सरंक्षणासाठी जिल्ह्यात लवकरच समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यप्राण्यांपासून सरंक्षणासाठी 
जिल्ह्यात लवकरच समिती
वन्यप्राण्यांपासून सरंक्षणासाठी जिल्ह्यात लवकरच समिती

वन्यप्राण्यांपासून सरंक्षणासाठी जिल्ह्यात लवकरच समिती

sakal_logo
By

वन्यप्राण्यांपासून सरंक्षणासाठी
जिल्ह्यात लवकरच समिती

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

कणकवली,ता. २८ : जिल्हातील गावागावांत वन्य प्राण्यांचे नागरिकांवर हल्ले होत आहेत. तसेच शेती बागायतीचे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लवकर समिती गठीत केली जाणार आहे. आमदार नितेश राणे यांनी याबबात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली आहे.
जिल्हातील नागरिकांचे संरक्षण व्हावे. त्यांच्या पिकांची नासधूस थांबावी. हत्ती, गवे, वानर, कोल्हे यांचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव थांबावा. यासाठी वनविभागाकडून समिती गठीत केली जाणार आहे. या समितीवर आमदार नितेश राणे यांचा समावेश करून शेतकऱ्यांच्या हिताच्या असणाऱ्या सर्व सूचना अंमलात आणल्या जातील, अशी ग्वाही विधानसभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कोकणात वन्यप्राण्यांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात. वन कर्मचारी आणि रिक्त पदांची भरती करावी. हत्ती, गवे, माकड व इतर प्राणी यांना गावातून जंगलात हाकलण्यासाठी जीवितहानी न होता विशिष्ट प्रकारच्या बंदुका पुरविल्या जाव्यात आणि त्यासाठी मनुष्यबळ आणि आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जावा, अशी मागणी विधानसभेत आमदार नितेश राणे यांनी केली. त्यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पदभरतीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. जवळपास तीन हजार पदे भरली जाणार आहेत. ‘टीसीएस’ नावाच्या कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू आहे. वन्य प्राण्यांचा उपद्रव कसा थांबवावा यासाठी वन विभाग एक समिती गठीत करणार आहे. प्रत्येक सूचना जनतेच्या हितासाठी कशा अंमलात आणता येतील याचा निश्चितच प्रयत्न करू, असा विश्वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिला.