धूळ आणि खड्ड्यांचा त्रास अजूनही कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धूळ आणि खड्ड्यांचा त्रास अजूनही कायम
धूळ आणि खड्ड्यांचा त्रास अजूनही कायम

धूळ आणि खड्ड्यांचा त्रास अजूनही कायम

sakal_logo
By

rat२८१४.txt

(टुडे पान ४ साठीमेन)

फोटो ओळी
-rat२८p१२.jpg ः
७१५४९

चिपळूण ः शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर अशाप्रकारे खड्डे पडलेले आहेत तरीही एजन्सीकडून खड्डे झाल्याचा खोटा दावा केला जात आहे.
--

चिपळुणात धूळ, खड्ड्यांचा त्रास कायम

चौपदरीकरणाचे काम ; वाहनेही नादुरुस्त, व्यवसायिकांनाही फटका

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २८ ः शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचा सर्विस रोड अजूनही खड्डेमय आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अजूनही धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची एक बाजू तात्पुरती दुरुस्त करण्यात आली असली तरी दुसऱ्या बाजूचे खड्डे अजूनही कायम आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चिपळूण शहरातून जातो. महामार्गाच्या चौपदरीकरणात शहरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयापर्यंत रस्त्याचे दोन भाग झाले आहेत. दोन्ही भागातील रस्ता पावसाळ्यात खड्डेमय झाला होता. पावसाळ्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ होती. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना खड्ड्यांसह धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अनेक प्रकारचे आजारही शहरातील नागरिकांना व प्रवाशांना होऊ लागले; मात्र रस्ते दुरुस्तीकडे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीने दुर्लक्ष केले होते. अॅड. ओवेस पेचकर यांनी या संदर्भात न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा दावा एजन्सीकडून करण्यात आला होता. तो खोटा असल्याचे पेचकर यांनी फोटोसहित न्यायालयामध्ये सिद्ध केले. त्यानंतर महामार्गावरील रस्ते दुरुस्तीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची मुदत एजन्सीला देण्यात आली. दरम्यान, महामार्गावरील काही खड्डे बुजवण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा पॅचवर्क करण्यात आला आहे; मात्र अजूनही काही ठिकाणी रस्ते जैसे थे आहेत. सावर्डेहून बहादूरशेख नाकाकडे जाणारा रस्ता गणपती मंदिरापासून ते बहादूरशेख नाकापर्यंत खड्डेमय झाला आहे. या खड्ड्यांमध्ये वाहने आढळून वाहनांचे अनेक पार्ट निकामी होत आहेत. या रस्त्यावर डांबराचा एक थरसुद्धा नाही. रस्त्यावर प्रचंड धूळ साचत असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना त्याचा त्रास होत आहे. त्याशिवाय या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या धुळीचा त्रास होत आहे. दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या नवीन वस्तूंवर धूळ साचत आहे. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी एजन्सीकडून काहीवेळेला पाणी मारले जाते. तेवढ्यापुरता त्रास कमी होतो नंतर पुन्हा धुळीचा त्रास सुरू होतो.
-
कोट
रस्त्याचे दोन भाग झाल्यामुळे आधीच या भागातील विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच आता धूळ आणि खड्ड्यांच्या त्रासामुळे वाहने या मार्गावरून येतच नाहीत. अनेक वाहने काविळतळीमार्गे बहादूरशेख नाक्यावर बाहेर पडतात. धूळ आणि खड्ड्यांच्या या त्रासातून कधी मुक्तता मिळेल देव जाणो.
- फैसल शेख, व्यापारी