चिपळुणात हवा जलद गाड्यांना थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात हवा जलद गाड्यांना थांबा
चिपळुणात हवा जलद गाड्यांना थांबा

चिपळुणात हवा जलद गाड्यांना थांबा

sakal_logo
By

rat२८१५.txt

(टुडे पान ४ साठी)

चिपळुणात हवा जलद गाड्यांना थांबा

आरक्षण कोट्याचीही मागणी ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

चिपळूण, ता. २८ ः चिपळूण रेल्वेस्थानकावर आरक्षण कोटा आणि जलद गाड्यांचे थांबे कधी मिळणार? चिपळूण-पनवेल स्वतंत्र रेल्वे कधी सुरू होणार? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.
चिपळूण शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेले वालोपे येथील चिपळूण रेल्वेस्थानक गेली अनेक वर्षे अडगळीत पडल्याची स्थिती आहे. कोकण रेल्वेमार्गावरून २४ तासात २५ हून अधिक रेल्वे धावतात. यातील कोकणकन्या, मांडवी, तुतारी, नेत्रावती, जनशताब्दीसह काही गाड्यांना या स्थानकावर थांबा आहे. उर्वरित रेल्वे येथे फक्त पाणी भरण्यासाठी थांबतात. प्रवाशांनी या रेल्वेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी रेल्वेचे डबे उघडले जात नाहीत. सण आणि उत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपात जादा गाड्यांची व्यवस्था केली जाते. त्यानंतर त्या गाड्या पुन्हा बंद केल्या जातात. वास्तविक चिपळूण ते पनवेलपर्यंत धावणारी स्वतंत्र रेल्वे असावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकदम गेली २० वर्षे करत आहेत. त्यांच्या मागणीकडे कोकण रेल्वे महामंडळाने लक्ष दिलेले नाही.
मुंबईकडे जाणाऱ्या किमान एका एक्स्प्रेस रेल्वेमध्ये चिपळूणसाठी स्वतंत्र डबा असावा तसेच उर्वरित रेल्वेगाड्यांमध्ये चिपळूणसाठी राखीव कोटा मिळावा, अशी मागणी प्रवाशांकडून सुरू आहे. त्यालाही दाद दिली जात नाही. गाड्यांचे वेळापत्रक पाहता सकाळी रेल्वेने मुंबईत जाऊन संध्याकाळी परत येणे चिपळूणमधील नागरिकांना शक्य होत नाही. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांची संख्या मोठी असूनही रेल्वेस्थानकाकडे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी आहे.


रस्त्याचीही दुरवस्था
रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याच रस्त्यावरून लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी सातत्याने ये-जा करतात; परंतु रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष दिले जात नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.

कोट
मुंबईहून चिपळूणमध्ये गावी तातडीचे काम असल्यास खासगी बस किंवा वाहनाने यावे लागते. त्यात जास्त पैसे खर्च करावे लागतात. रोहापर्यंत सुरू असलेली लोकल रेल्वे चिपळूणपर्यंत आणावी, या मागणीसाठी आम्ही मुंबईतील चाकरमानी मुंबईतील लोकप्रतिनिधींनाही भेटलो; परंतु आमच्या मागण्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना भविष्यात मतदान करायचे की नाही, असा प्रश्न आहे.
- वैभव चव्हाण, अडरे, (सध्या रा. कांदिवली)