ग्रामीण भागात उद्योजकतेतून आर्थिक समृद्धी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात उद्योजकतेतून आर्थिक समृद्धी
ग्रामीण भागात उद्योजकतेतून आर्थिक समृद्धी

ग्रामीण भागात उद्योजकतेतून आर्थिक समृद्धी

sakal_logo
By

rat२८२५.txt

(टुडे पान ४ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat२८p७.jpg-
७१५४३
मुंबई ः आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारप्राप्त उद्योगिनींसमवेत मान्यवर डॉ. अनिल काकोडकर, दीपक घैसास, मीनल मोहाडीकर आदी.
---
ग्रामीण भागात उद्योजकतेतून आर्थिक समृद्धी

डॉ. काकोडकर ; आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २८ ः ग्रामीण भागात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम ''आम्ही उद्योगिनी'' करत आहोत. आज प्रदान झालेल्या ''आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान'' बिजनेस एक्स्चेंज पुरस्कारांमुळे ग्रामीण भागात उद्योजकतेचे प्रमाण वाढल्यास तिथे आर्थिक समृद्धी येईल, असा विश्वास ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.
''आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान''तर्फे यंदा पहिल्यांदा देशभरातील गुणी उद्योजकांचा शोध घेण्यात आला आणि त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. त्या वेळी डॉ. काकोडकर बोलत होते. दादरमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी ज्येष्ठ उद्योजक दीपक घैसास प्रमुख पाहुणे होते. दरवर्षी डिसेंबरमध्ये हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक मीनल मोहाडीकर म्हणाल्या, गेली २५ वर्षे महाराष्ट्रात काम करत आहोत; पण यंदा स्वतःला फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता देशभरातून गुणी उद्योजकांचा शोध घ्यायचा ठरवले आणि त्यातून या पुरस्काराची कल्पना पुढे आली. कोणतेही प्रवेशशुल्क घेतले नाहीत. देशभरातून ५०० प्रवेशिकांपैकी शंभरजणांना निवडून मुलाखती घेतल्या. त्यांना आरोग्यापासून ते व्यवसायवृद्धी, ऑनलाइन, नेटवर्किंगचे विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. यातून ३४ जणांची निवड केली. परीक्षक म्हणून थायलंडमधील ज्येष्ठ मार्केटिंगतज्ञ अमित वाईकर, उद्योजिका उर्वशी धराधर, फूड टेक्नॉलॉजिस्ट डॉ. भाजेकर, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष व उद्योजक अनिल गचके आणि मॅजिक संघटनेचे संस्थापक आशिष गर्दे यांनी काम पाहिले. ३४ पैकी १६ जणांना विविध गटांमध्ये पुरस्कार देण्यात आले.
---

पुरस्कार असे
आयकॉनिक ब्रँड ऑफ दी इयर- मृणाल सराफ, मॅन्युफॅक्चरिंग स्टार पुरस्कार- सोनाली कोचरेकर, वर्षातील सर्वोत्कृष्ट कारागीर- धनश्री पाठक, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार- विनिता शिरोडकर, उत्कृष्ट सेवा पुरस्कार, (इतर)- मृणाली चव्हाण, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप् आयडिया पुरस्कार- सायली मिहे, उत्कृष्ट सेवा पुरस्कार (अन्न उद्योग)- प्रसाद सावंत, सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक (५० वर्षाखालील)- सीमा महाजन, उत्कृष्ट सेवा पुरस्कार (फॅशन आणि ब्लॉगिंग)- शिमुल भट, उत्कृष्ट सेवा पुरस्कार (वस्त्रोद्योग)- रेखा बोरकर, सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक (३० वर्षांखालील)- मधुरा पाटणकर, सर्वोत्कृष्ट व्यापारी आणि घाऊक विक्रेता पुरस्कार- स्वप्नाली मठकर, वर्षाची संकल्पना- योगिता कुलकर्णी, वर्षातील सर्वोत्कृष्ट अॅग्रो प्रोसेसर- उज्ज्वला गोसावी, वर्षातील सर्वोत्तम ब्रँड- जयश्री यादव, वर्षातील सर्वोत्तम ब्रँड- अपर्णा कुलकर्णी, वर्षातील आदर्श महिला- ऋता पंडित.