पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

sakal_logo
By

71613
पाट ः येथील पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनमार्फत ज्ञानज्योती शिष्यवृत्ती देण्यात आली.


पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
कुडाळ ः एस. एल. देसाई विद्यालय, पाटमधील पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत ज्ञानज्योती शिष्यवृत्ती देण्यात आली. ज्योती बुट्टे (बारावी विज्ञान), स्नेहा खवणेकर (बारावी वाणिज्य), वेदिका चव्हाण (अकरावी कला) अंकीता जळवी आणि भूषण राऊत (अकरावी विज्ञान) या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीमार्फत विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. यामध्ये नेहमीच पाट हायस्कूलचा सहभाग असतो. पाट हायस्कूलच्या होतकरू विद्यार्थ्यांचे कौतुक नेहमीच ग्लोबल फाउंडेशनतर्फे करण्यात येते. या निवड केलेल्या गरीब होतकरू विद्यार्थिनींची ग्लोबल फाउंडेशनचे संचालक प्रसाद परब, गुरु देसाई, उपक्रमप्रमुख संदीप साळसकर यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट सचिव सुधीर ठाकूर, चेअरमन समाधान परब, मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी आभार मानले.
--------
भावेश कुडतरकरचे कॅरममध्ये यश
सावंतवाडी ः राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत आयोजित शालेय क्रिडा स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील कॅरम स्पर्धेत सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलचा आठवीचा विद्यार्थी व सावंतवाडी मुक्ताई अॅकॅडमीचा विद्यार्थी भावेश कुडतरकर याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याची राज्यस्तस्तर स्पर्धेत निवड झाली आहे. भावेश याने १४ वर्षीय गटातील बुद्धिबळ स्पर्धेतही विभागस्तरापर्यंत यश मिळविले आहे. त्याच्या उत्कृष्ट दुहेरी यशाबद्दल शाळेतील प्राचार्य, शिक्षकवर्ग व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कॅरम स्पर्धा रत्नागिरी येथे घेण्यात आली होती तर बुद्धिबळ स्पर्धा हिर्लोक येथे घेण्यात आली होती.