हातिस शाळेत रक्तदान शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातिस शाळेत रक्तदान शिबीर
हातिस शाळेत रक्तदान शिबीर

हातिस शाळेत रक्तदान शिबीर

sakal_logo
By

rat२८२९.txt

(टुडे पान ४ साठी)

फोटो ओळी
-rat२८p३.jpg-
७१५३९
रत्नागिरी ः हातिस जिल्हा परिषद शाळेत रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सोबत मंडळाचे पदाधिकारी.
---
हातिस शाळेत रक्तदान शिबिर

रत्नागिरी, ता. २८ ः हातिस जिल्हा परिषद शाळा हातिसच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील हातिस ग्रामविकास मंडळाअंतर्गत बाबरशेख क्रीडामंडळ आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शाळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये एकूण २८ स्त्री-पुरुषांनी रक्तदान केले.
हातिस ग्रामस्थांच्यावतीने हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, माजी अध्यक्ष विजय उर्फ बबन नागवेकर, माजी कार्याध्यक्ष जयवंत नागवेकर, माजी अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, क्रीडामंडळाचे सदस्य उपेंद्र नागवेकर, अनिकेत नागवेकर, हातिस ग्रामविकास मंडळाचे सदस्य बिल्वमंगल नागवेकर, मोहन नागवेकर (ग्रामस्थ) यांच्यावतीने गुलाबपुष्प देऊन जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मुग्धा फडके, डॉ. स्नेहल कुबेर, कर्मचारी सागर चव्हाण, संदीप पवार आणि संदीप वाडेकर यांनी रक्तदानाचे काम पाहिले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी क्रीडामंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपेंद्र नागवेकर, संकेत नागवेकर, केतन कीर, पराग नागवेकर, अक्षय नागवेकर, सुयोग विलणकर, अनिकेत नागवेकर, रूपेश नागवेकर, सिद्धेश नागवेकर, श्रद्धा नागवेकर, मनिषा नागवेकर, आर्यन नागवेकर यांनी नियोजन केले.