प्रभारी कुलगुरू डॉ. शिर्केंची दळवी महाविद्यालयास भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभारी कुलगुरू डॉ. शिर्केंची 
दळवी महाविद्यालयास भेट
प्रभारी कुलगुरू डॉ. शिर्केंची दळवी महाविद्यालयास भेट

प्रभारी कुलगुरू डॉ. शिर्केंची दळवी महाविद्यालयास भेट

sakal_logo
By

71574
तळेरे ः प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग. सोबत डॉ. नंदकुमार मोरे. (छायाचित्र : एन. पावसकर)

प्रभारी कुलगुरू डॉ. शिर्केंची
दळवी महाविद्यालयास भेट
तळेरे : मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी येथील विद्यापीठाच्या येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालयीन गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, दळवी महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. शिर्के यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून विविध क्षेत्रांत पुढे यावे. येथे चांगले विद्यार्थी घडून खऱ्या अर्थाने महाविद्यालय आदर्श व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीश गुरव यांनी केले.