आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खासदार, आमदारांकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 
खासदार, आमदारांकडून मदत
आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खासदार, आमदारांकडून मदत

आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खासदार, आमदारांकडून मदत

sakal_logo
By

७१६४९


आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना
खासदार, आमदारांकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २८ : गणराज्यदिनी, २६ जानेवारीला राजपथावरील कार्यक्रमासाठी आचरा कॉलेजचे विद्यार्थी दिल्लीवारी करणार आहेत. यासाठी येणाऱ्या प्रवासखर्चासाठी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येकी वीस हजार, असे चाळीस हजार रुपये देऊन मदतीचा हात दिला आहे. आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खासदार राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, आचरा कॉलेज लोकल कमिटी पदाधिकारी विद्यानंद परब, रुपेश साटम आदी उपस्थित होते. खासदार राऊत यांनी, ग्रामीण भागातून असून सुद्धा ऑल इंडिया प्रतियोगितेमध्ये २२५ संघांतून निवड झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी तसेच नृत्य दिग्दर्शकांचे अभिनंदन केले. तसेच वीस हजार विमानप्रवासासाठी मदत म्हणून देत दिल्लीमध्ये या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संसद भवन, इतर वास्तू, शासनाची सुरक्षा दाखविण्याची ग्वाही दिली. आचरा पीपल्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या प्रगतशील वाटचालीसाठी अभिनंदन केले. आमदार नाईक यांनी विद्यार्थांचे अभिनंदन करून रोख वीस हजार रुपयांची मदत दिली. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन शाळा, कॉलेजसह गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.