
फोटोसंक्षिप्त-माजी विद्यार्थ्यांचा देवबागला स्नेहमेळा
७१६७६
फोटोसंक्षिप्त
टीपः swt२८२६.jpg मध्ये फोटो आहे.
माजी विद्यार्थ्यांचा देवबागला स्नेहमेळा
मालवण : अहिल्या विद्या मंदिर, भांडूप, पश्चिम मुंबई येथील दहावी उत्तीर्ण बॅच १९८९ चे मित्र-मैत्रिणी मालवण देवबाग येथे गेट टूगेदरच्या निमित्ताने एकत्र आले. मागील १० वर्षांपासून हे सर्व जुने मित्र-मैत्रिणी मेळाव्याच्या निमित्ताने वर्षातून २ ते ३ वेळा एकत्र भेटतात. मित्र परिवारातील राखी मोरे हिने पुढाकार घेऊन जवळपास ५० मित्र मैत्रिणींना मालवण येथे एकत्र आणले. या ग्रुपच्या माध्यमातून बरेच सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात, अशी माहिती दादा मायनाक यांनी दिली.
टीपः swt२८२७.jpg मध्ये फोटो आहे.
७१६७७
देवगड हायस्कूलच्या पाच
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
देवगड, ता. २८ ः येथील शेठ म. ग. हायस्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनच्यावतीने ज्ञानज्योती शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ३ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. पिंगुळी (कुडाळ) येथील ग्लोबल फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. संस्थेमार्फत यावर्षी प्रशालेतील गौरी वेतकर, कशिश मिठबांवकर, आयुश भाबल, अथर्व कोयंडे, निधी पराडकर या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ३ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. ग्लोबल फाउंडेशनचे संचालक प्रसाद परब, गुरू देसाई यांनी या विद्यार्थ्यांची निवड केली. प्रशालेचे मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक सुनील घस्ती तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानले.