कासवांच्या हजार पिल्लामागे केवळ तीन टक्केच समुद्रात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासवांच्या हजार पिल्लामागे केवळ तीन टक्केच समुद्रात
कासवांच्या हजार पिल्लामागे केवळ तीन टक्केच समुद्रात

कासवांच्या हजार पिल्लामागे केवळ तीन टक्केच समुद्रात

sakal_logo
By

ratchl२८१.jpg
७१५८४
चिपळूणः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोहन उपाध्ये व मौर्य साडविलकर.
-ratchl२८२.jpg ः
७१५८५
उपस्थित गोडबोले क्लासेसचे विद्यार्थी.
-----------
हजारात तीन टक्केच पिल्ले समुद्रात
मोहन उपाध्ये; कासवे येण्याचे प्रमाण झाले कमी, संवर्धनाची गरज
चिपळूण, ता. २८ः जिल्ह्यातील किनाऱ्यावर कासव संवर्धनावर जास्त लक्ष द्यायला हवे. पूर्वी वेळास व कोकण किनारपट्टीवर भरपूर कासवे यायची. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता ४० ते ४५ कासवं अंडी घालायला येतात. अंडी चोरणे व खाल्ल्याने येथे कासवे येण्याचे प्रमाण कमी झालंय. हजार पिल्ल जन्माला आली तर केवळ ३ टक्केच पिलं समुद्रात जातात, अशी माहिती मॅनग्रोव्ह फाउंडेशन रिसर्च असिस्टंट मोहन उपाध्ये यांनी कासव संवर्धनाविषयी दिली.
येथील गोडबोले क्लासेसच्यावतीने समुद्री कासव व खवले मांजर संवर्धनाविषयी तज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यामध्ये सह्याद्री निसर्गमित्रच्या मोहन उपाध्ये व मौर्य साडविलकर यांनी मार्गदर्शन केले. गोडबोले क्लासेसचे प्रा. अमेय गोडबोले यांनी व्याख्यानाचा हेतू स्पष्ट केला. शहरातील परशुराम नगर येथील ओक अॅकॅडमीच्या सभागृहात व्याख्यान झाले.
श्री. उपाध्ये म्हणाले, कासवांच्या पिल्लांचा समुद्रातील प्रवास जाणण्यासाठी वेळास आणि गुहागर येथून ५ कासवांवर सॅलेटाईट टॅगिंग सह्याद्री निसर्गमित्रच्या माध्यमातून केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेदरबॅग कर्टल नावाचे कासव मिळाले. ते शाकाहारी असून ते समुद्री शेवाळ सेवन करून जगते. कासवांच्या सात जातीत या शाकाहारी कासवांचा समावेश आहे. या कासवांमुळे समुद्राचे प्रदूषण थांबण्यास मदत होते. यावर सह्याद्री निसर्गमित्र जनजागृतीचे काम करत आहे. त्याचा परिपाक म्हणून लोकांमध्ये कासवांविषयी जागृती निर्माण झालेली आहे. आता लोकं कासवांची अंडी खात नाहीत. कासवांच्या संवर्धनासाठी त्याचाही पुढाकार असतो. सॅटेलाईट टॅगिंगचे काम मोहन उपाध्ये यांनी प्रथम सुरू केले. म्हणून त्यांना कासवांचे बाबा असे म्हटले जाते. गोडबोले क्लासेसच्यावतीने उपाध्ये व साडविलकर यांचा रोप व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या वेळी डॉ. मिनल ओक, अनंत ओक, विष्णू काणे, ''सकाळ''चे मनोज पवार उपस्थित होते.
------
चौकट
खवले मांजराच्या खवल्यांचा औषधात उपयोग नाही : साडविलकर
मौर्य साडविलकर यांनी खवले मांजरांची माहिती दिली. ते म्हणाले, खवले मांजराची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चायनीज औषधांमध्ये खवल्यांचा वापर केला जातो, असा लोकांचा समज आहे; मात्र या खवल्यांचा त्या औषधांमध्ये काहीही उपयोग नसतो. ही खवले केरॅटीनपासून बनलेली असतात. या खवल्यांचा औषधांमध्ये काहीही उपयोग नसल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. सह्याद्री निसर्ग मित्रने खवले मांजरांवर संशोधन सुरू केले आहे. खवले मांजर वाळवी व मुंग्या खातो. खवले मांजर निसर्गाचे पेस्टकंट्रोल म्हणूनही काम करतो. खवले मांजराची हत्या करून त्यांचे प्रमाण कमी झाल्यास निसर्गाचा समतोल बिघडणार आहे. परिणामी, त्याचा त्रास माणसाला होणार आहे.