पिसेकामते येथून ‘सीसीटीव्ही’ चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिसेकामते येथून ‘सीसीटीव्ही’ चोरीस
पिसेकामते येथून ‘सीसीटीव्ही’ चोरीस

पिसेकामते येथून ‘सीसीटीव्ही’ चोरीस

sakal_logo
By

पिसेकामते येथून ‘सीसीटीव्ही’ चोरीस
कणकवली ः पिसेकामते-कदमवाडी (ता. कणकवली) येथील घर आणि आंब्याच्या बागेमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरीस गेले आहेत. ही चोरी ९ सप्टेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत झाल्याची फिर्याद प्रकाश शशिकांत शिंदे यांनी दिली. श्री. शिंदे हे मुंबईमध्ये असतात. आपल्या घराच्या आणि बागेच्या संरक्षणासाठी त्यांनी नऊ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवले होते; मात्र कुणीतरी यापैकी तीन ‘सीसीटीव्ही’ चोरून नेले. याची किंमत सुमारे सहा हजार रुपये आहे. याबाबत येथील पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. महिला कॉन्स्टेबल एम. सी. राणे अधिक तपास करीत आहेत.