मार्गताम्हाणे सुतारवाडी येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्गताम्हाणे सुतारवाडी येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
मार्गताम्हाणे सुतारवाडी येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

मार्गताम्हाणे सुतारवाडी येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

rat२८१८.txt

(पान ३ साठी)

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
मार्गताम्हाणेतील घटना ; एक जखमी
चिपळूण, ता. २८ ः मार्गताम्हाणे-सुतारवाडी येथे चिपळूण-गुहागर मार्गावर चार चाकी आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीत मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला तरुण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (ता. २६) रात्री झाला.

पोलिसांनी सांगितले, की शहरातील मुरादपूर येथील तरुण समीर सलीम मन्सुरी (वय २४, रा. मुरादपूर, चिपळूण) हा तरुण व त्याचा मित्र शुभम यादव (१८, भोईवाडी-मुरादपूर) हे दोघे दुचाकीने चिपळूणकडे जात होते. याच दरम्यान चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जाणाऱ्या एक चारचाकी येत होती. या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. यामध्ये समीर खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मित्र यादव हा जखमी झाल्याने त्याला चिपळूण येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस व स्थानिक ग्रामस्थ दाखल झाले होते.