शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या
शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

sakal_logo
By

rat२८४१.txt

(पान ५ साठी)

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

आमदार निकम ; आंतरजिल्हा बदल्यांमुळे नुकसान

चिपळूण, ता. २८ ः कोकणातील शिक्षणाचा विचार करता स्थानिकांना प्राधान्य द्या. शिक्षक म्हणून कोकणात रुजू होतात आणि आंतरजिल्हा बदली करून निघून जातात. शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल, पुरेपूर शिक्षकसंख्या राखायची असेल तर स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी केली. त्यानुसार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विभागस्तरावर भरतीचा विचार सुरू असल्याचे सकारात्मक उत्तर दिल्याने स्थानिकांना न्याय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिवाळी अधिवेशनात चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वरच्या विकासासंदर्भात जोरदार आवाज उठवत अनेक सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अधिवेशनाचा पहिला आठवडा गाजवल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात आमदार निकम यांनी सभागृहात विषय मांडून दाद मागितली आणि त्यामध्ये यशही आल्याचे दिसत आहे. आज शिक्षणासंदर्भात चर्चेत आमदार निकम यांनी मुद्देसूद मांडणी करताना सांगितले की, शिक्षकांचा बॅकलॉक जर भरून काढायचा असेल तर काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. मुळात भरती होताना परजिल्हातून अनेकजणांची निवड होते. कालांतराने अनेक शिक्षक आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. ऑगस्ट २२ मध्ये ४४० शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे.
कोकण म्हणजे पालघर-रायगड याचा विचार करता साडेसातशे शिक्षक आंतरजिल्हा बदली होऊन गेले आहेत. कोकण हा डोंगराळ भाग आहे, शाळा दूरदूर आहेत या साऱ्यांचा अभ्यास करता स्थानिक पातळीवर भरती झाली तर शिक्षकांचा बॅकलॉक राहणार नाही, असे स्पष्ट केले. आमदार निकम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विभागीय स्तरावर भरती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र मार्चपर्यंत शिक्षकांचा बॅकलॉक भरला जाईल, असे स्पष्ट केले.