वेंगुर्ले-पाल सड्यावर भीषण आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले-पाल सड्यावर भीषण आग
वेंगुर्ले-पाल सड्यावर भीषण आग

वेंगुर्ले-पाल सड्यावर भीषण आग

sakal_logo
By

71721
पाल ः सडा भागात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन दलाचे जवान व ग्रामस्थ.

वेंगुर्ले-पाल सड्यावर भीषण आग

आंबा, काजू कलमे खाक; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ ः पाल (ता.वेंगुर्ले) येथील सड्यावर बबन मेस्त्री यांच्या मांगराजवळ आज दुपारी दीडच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे १५० एकर परिसरातील आंबा, काजू कलमे जळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या साहय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र दुपारची वेळ असल्याने आग अल्पावधीत सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ग्रामस्थांमार्फत तातडीने वेंगुर्ले पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर त्यांच्यामार्फत वेंगुर्ले पालिकेच्या अग्निशमन बंबासाठी कळविण्यात आले. या अग्निशमन बंबाचा टायर पंक्चर असल्याने कुडाळ अग्निशमन दलाची मदत मागविण्यात आली. ही टीमही पोचण्यास उशीर झाला; तोपर्यंत ग्रामस्थांनी आग विझविली. नंतर धुमसत असलेल्या आगीवर अग्निशमन दलाने पाणी मारले. यावेळी वेंगुर्ले पोलिस पथकही हजर झाले होते. घटनास्थळी पोलिस हवालदार सखाराम परब, संतोष दाभोलकर, ट्राफिक पोलिस मनोज परुळेकर, तुषार मांजरेकर यांनी तत्काळ धाव घेतली. यावेळी पाल सरपंच कावेरी कमलेश गावडे, मातोंड सरपंच जानवी परब, पाल ग्रामस्थ विलास गावडे, दीपक गावडे, उत्तम गावडे, रवींद्र गावडे, अरुण गावडे, श्रीकांत मेस्री, बबन मेस्त्री, रमेश आमडोसकर, संजय पालकर, मोहन गावडे, राजाराम गावडे, लवू परब, जयराम परब, जगन्नाथ गावडे, प्रसाद गावडे, तुकाराम गावडे, योगेश कोळसुलकर, प्रदीप मुळीक, संदीप नाईक, प्रभाकर गावडे, तलाठी धुमाळे, पोलिस पाटील नाईक आदी उपस्थित होते.
--
विद्युतभारीत तारांमुळे आगीचा संशय
पाल सड्यावर आग लागण्याचे प्रकार गेली कित्येक वर्षे घडत आहेत. ही आग विद्युत तारांच्या घर्षणाने लागत असल्याचा संशय असून यासंबंधीची तक्रार घेऊन उद्या (ता. २९) कुडाळ विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते कमलेश गावडे यांनी सांगितले.