जिल्हास्तरीय शरीरसौष्ठवात वेंगुर्लेचे राजेश हिरोजी विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठवात वेंगुर्लेचे राजेश हिरोजी विजेते
जिल्हास्तरीय शरीरसौष्ठवात वेंगुर्लेचे राजेश हिरोजी विजेते

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठवात वेंगुर्लेचे राजेश हिरोजी विजेते

sakal_logo
By

swt2914.jpg
71811
सावंतवाडी : विजेत्यांसोबत बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, शरीरसौष्ठवपटू अतुल आम्रे, करण चौधरी, आशिष वर्तक, डॉ. राजन जाधव, शिवाजी जाधव आदी.

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठवात
वेंगुर्लेचे राजेश हिरोजी विजेते
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन पुरस्कृत ''टीम शिवाजी क्लासिक 2022'' जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग आणि मेन्स शरीरसौष्ठव स्पर्धा सावंतवाडीत पार पडली. या स्पर्धेत माजी सैनिक राजेश हिरोजी (प्रो- फिटनेस, वेंगुर्ले) विजेता ठरले. स्पर्धेस स्पर्धकांसह रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शरीरसौष्ठव विजेता-ओम सावंत (टीम शिवाजी), बेस्ट पोझर-चंद्रकांत कुबल (सातेरी जिम वेंगुर्ले), मोस्ट इम्प्रुव्ह-रामदास राऊळ (टीम शिवाजी) ठरले. शेकडो स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पाच ते सहा राउंडमध्ये ही स्पर्धा झाली. प्रत्येक राउंडमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देत गौरव करण्यात आला. विजेते हिरोजी हे माजी सैनिक असून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शरीरसौष्ठवावर मेहनत घेतली. अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, शरीरसौष्ठव अतुल आम्रे, करण चौधरी, आशिष वर्तक, डॉ. राजन जाधव, टीम शिवाजीचे शिवाजी जाधव, सतीश बागवे, यश सावंत आदी उपस्थित होते.