विभागीय कॅरम स्पर्धेत साक्षी रामदूरकर अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागीय कॅरम स्पर्धेत साक्षी रामदूरकर अव्वल
विभागीय कॅरम स्पर्धेत साक्षी रामदूरकर अव्वल

विभागीय कॅरम स्पर्धेत साक्षी रामदूरकर अव्वल

sakal_logo
By

विभागीय कॅरम स्पर्धेत
साक्षी रामदूरकर अव्वल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ः रत्नागिरी जिल्हा क्रिडा संकुल येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय कॅरम स्पर्धेत येथील मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदूरकर हिने सातत्यपूर्ण खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. अकरा वर्षीय साक्षीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात कोल्हापूर विभागात निर्विवाद वर्चस्व मिळविले. जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरमपटू, प्रशिक्षक आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे उल्लेखनीय यश मिळविले.
तालुक्यात, जिल्ह्यात आणि विभागीय कॅरम स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक मिळवणारी ती जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी तिचे कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक (कै.) सूर्यकांत पेडणेकर यांचे सुपुत्र कौस्तुभ पेडणेकर यांच्या मुक्ताई ॲकेडमीला सांगली येथे ‘बेस्ट ॲकेडमी’ पुरस्कार मिळाल्याबददल पेडणेकर आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून ॲकेडमीने राष्ट्रीय खेळाडू तयार करावेत, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरस यांनी ॲकेडमीचे राज्यस्तरीय कॅरम खेळाडू साक्षी रामदूरकर, क्षितिजा मुंबरकर, भावेश कुडतरकर, यशराज गवंडे, राष्ट्रीय बुदधीबळ खेळाडू विभव राऊळ, यश सावंत, भावेश कुडतरकर, प्रतीक देसाई यांचे कौतुक केले.