जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस 
कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

फोटो दिसत नाही

टीपः swt298.jpg मध्ये फोटो आहे.

कणकवली ः शालेय चित्रकला स्पर्धेचे उद्‍घाटन करताना साहित्यिक बाबुराव शिरसाट. सोबत पी. के. कांबळे, महेश काणेकर, कलाशिक्षिका शुभांगी राणे, राकेश काणेकर, इंगळे आदी.


जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस
कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २९ : कला तपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा कणकवली येथे घेण्यात आली. यामध्ये विविध गटांतील १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभागी घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिध्द साहित्यिक बाबुराव शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक पी. के. कांबळे, ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर, कलाशिक्षिका शुभांगी राणे, राकेश काणेकर, इंगळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी ते बारावी अशा गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गटातून प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढले जाणार आहेत. विजेत्यांना 7 जानेवारीला कणकवली येथे होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकालही लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर यांनी दिली.