आविष्कारमध्ये खरवते महाविद्यालयाला पाच सुवर्णपदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आविष्कारमध्ये खरवते महाविद्यालयाला पाच सुवर्णपदके
आविष्कारमध्ये खरवते महाविद्यालयाला पाच सुवर्णपदके

आविष्कारमध्ये खरवते महाविद्यालयाला पाच सुवर्णपदके

sakal_logo
By

rat२९१५.txt

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat२९p११.jpg ः
७१७९९
चिपळूण ः दापोली कृषी विद्यापीठात घेण्यात आलेल्या आविष्कारमध्ये यश प्राप्त करणारे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
---

खरवते महाविद्यालयाला पाच सुवर्णपदके

चिपळूण, ता. २९ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आविष्कार २०२२ ही आंतरमहाविद्यालयीन संशोधनात्मक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी पाच सुवर्णपदके व तीन रौप्यपदके पटकावत यश संपादन केले. या सर्व स्पर्धकांचा कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते पदके व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये वाणिज्य, कायदा व व्यवस्थापन विभागांतर्गत श्रद्धा उतेकर व विजय वारे यांनी प्रथम, रामेश्वरी रिंगे व हर्षदा वाघमोडे यांनी द्वितीय, अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागांतर्गत पियुष ठाकरे, सारंग सावर्डेकर यांनी प्रथम, मशिन व फार्मसी विभागांतर्गत विद्या पवार व विधी राठी यांनी प्रथम क्रमांक, विज्ञान विभागांतर्गत मृणाल ठाकरे व कल्याणी ठाकरे यांनी प्रथम, मृणाली सावंत, पूजा शितोळे यांनी द्वितीय व जानवी चव्हाण, सृष्टी साबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कृषी विभागांतर्गत पुष्पराज देशमुख व गणेश पवार यांनी प्रथम तर जुईली रहाटे व सिद्धार्थ राणे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.