हातिस शाळेत नृत्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातिस शाळेत नृत्य स्पर्धा
हातिस शाळेत नृत्य स्पर्धा

हातिस शाळेत नृत्य स्पर्धा

sakal_logo
By

rat२९१८.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
rat२९p६.jpg-
७१७७९
रत्नागिरी ः हातिस शाळेत आयोजित नृत्यस्पर्धेत समई नृत्य सादर करताना विद्यार्थिनी.
---
हातिस शाळेत नृत्य स्पर्धा
रत्नागिरी, ता. २९ ः हातिस ग्रामविकास मंडळातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातिसच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त परिसरातील शाळांसाठी नृत्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण प्राथमिक मराठी शाळा आणि माध्यमिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यात एकूण १८ समूहनृत्ये सादर केली. या स्पर्धा तीन गटात पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीसाठी स्पर्धा घेण्यात आली. सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. स्पर्धा परीक्षणाचे काम जिल्हास्तरीय भजन संघाचे उपाध्यक्ष सुदेश नागवेकर, पार्श्वगायक, नृत्यगुरू विठोबा नागवेकर यांनी पाहिले.
कार्यक्रमाचे नियोजन हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, माजी अध्यक्ष विजय (बबन) नागवेकर, कार्याध्यक्ष जयवंत नागवेकर, माजी अध्यक्ष संदेश नागवेकर, उपेंद्र नागवेकर, प्रमोद नागवेकर (मानकरी), विजय नागवेकर यांनी केले. संगीत आणि साऊंडसिस्टीम रूपेश नार्वेकर आणि अनिकेत नागवेकर यांनी सांभाळली. या वेळी हातिस शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा निवंडीकर आणि टेंभ्ये क्र. २, टिके भातडेवाडी, तोणदे, सोमेश्वर उर्दू शाळा आणि मराठी शाळा पोमेंडी या शाळा आणि (कै.) बा. रा. तथा हातिसकर मास्तर माध्यमिक विद्यालय आणि हरचिरी उमरे हायस्कूल यांनी सहभाग नोंदवला होता. या वेळी या सर्व शाळांचे शिक्षकवर्ग आणि पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.