
मिस्टर, मिस इंद्रधनुचा मानकरी ठरले
rat२९२०.txt
(टुडे पान २ साठीमेन)
फोटो आहे.
rat२९p१२.jpg-
७१८००
रत्नागिरी : नवनिर्माण कॉलेजच्या इंद्रधनु वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात मिस्टर इंद्रधनु आदित्य साळुंखे, मिस इंद्रधनु मैथिली सावंत यांना सन्मानित करताना अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, बशीर मुर्तूझा, सीमा हेगशेट्ये आदी.
---------
आदित्य साळुंखे मिस्टर, मैथिली सावंत मिस इंद्रधनू
नवनिर्माण महाविद्यालय ; लोकधारा नृत्यांतून संस्कृतीची ओळख
रत्नागिरी, ता. २९ : नवनिर्माण कॉलेजचे इंद्रधनु वार्षिक स्नेहसंमेलन स्वा. सावरकर नाट्यगृहात झाले. या वेळी या वर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मिस्टर इंद्रधनुसाठी आदित्य साळुंखे तर मिस इंद्रधनुसाठी म्हणून मैथिली सावंत यांची निवड करण्यात आली. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बशीर मुर्तूझा, संचालिका सीमा हेगशेट्ये यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
एस. पी. हेगशेट्ये आणि नवनिर्माण कनिष्ठ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रधनु युवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविधारंगी उपक्रम सादर करताना सृजनशील तरुणाईच्या आविष्काराची अनुभूती तरुणाईला पहावयास मिळाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रा. सचिन टेकाळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची लोकधारा नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी सादर केली. लावणी, कथ्थक, देशभक्ती, विरह गीत, गरबा, भांगडा, रॅप, टॅप, या नृत्याच्या थिमवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्ये केली. ग्रुप व सोलो अशा दोन प्रकारात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचे परिक्षण प्रा. ताराचंद ढोबळे, प्रा. निकिता नलावडे आदींनी केले.
या वर्षीचा मानाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कोणाला मिळतो याची उत्सुकता होती. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिस्टर इंद्रधनू आणि मिस इंद्रधनू हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. वरिष्ठ महाविद्यालयात यावर्षी आदित्य साळुंखे आणि मैथिली सावंत हे याचे मानकरी ठरले. कनिष्ठ महाविद्यालयात मोईनुद्दीन मुल्ला आणि श्रद्धा देवघरकर यांची मिस्टर आणि मिस्टर इंद्रधनूसाठी निवड करण्यात आली.