
पालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
rat२९२२.txt
(टुडे पान २ साठी)
फोटो ओळी-
-rat२९p१४.jpg-
७१८१९
पाली : मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिसानिमित्त अण्णा सामंत यांचा सत्कार करताना तात्या सावंत. शेजारी मुन्ना देसाई, केतन शेटे, विनया गावडे, कांचन नागवेकर आदी.
-----
पालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
रत्नागिरी, ता. २९ : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस पाली येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त मान्यवरांचे सत्कार, अनेक सामाजिक व वैद्यकीय उपक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
डी. जे. सामंत वरीष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर ''सन्मान कर्तृत्वाचा'' कार्यक्रम झाला. पाली, हातखंबा, हरचेरी विभागातील मान्यवर व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. महिला उद्योजिका तृप्ती शिवगण, निवृत्त सैनिक वेळवंडचे सुपुत्र मंगेश मोहिते, प्रयोगशील व उद्यमशील शेतकरी, क्रीडापटू, इस्त्रोमध्ये निवड झालेले विद्यार्थी, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, चरवेली, वेळवंड, साठरेबांबर, वळके या गावातील नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपचंयात सदस्य या मान्यवरांचा सत्कार केला.
याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, माझ्या राजकीय जीवनाची सुरवात पाली येथूनच झाली. त्यामुळे माझ्या जुन्या मित्राने येथे जो माझा वाढदिवस साजरा केला त्यामुळे मी खूप आनंदी झालो आहे. जिल्ह्यातील एकही युवक बेरोजगार राहणार नाही, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या सोहळ्याला जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बाबू म्हाप, सचिन (तात्या) सावंत, मुन्ना देसाई, तुषार साळवी, केतन शेट्ये आदी उपस्थित होते. हिंदी व मराठी सदाबहार गीतांचा कार्यक्रम झाला.