शेतकऱ्यांना नारळ, जायफळ, गांडूळ खताचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना नारळ, जायफळ, गांडूळ खताचे वाटप
शेतकऱ्यांना नारळ, जायफळ, गांडूळ खताचे वाटप

शेतकऱ्यांना नारळ, जायफळ, गांडूळ खताचे वाटप

sakal_logo
By

rat२९२६.txt

(टुडे पान २ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
rat२९p२४.jg-
७१८४६
कळझोंडी ः शेतीसाठी निविष्ठांचे वाटप करताना कृषीविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे.
--

शेतकऱ्यांना नारळ, जायफळ, गांडूळ खताचे वाटप

कळझोंडीत उपक्रम ; अनुसूचित जाती उपप्रकल्पातून लाभ
सकाळ वृत्तसेवा ः
पावस, ता. २९ ः रत्नागिरी तालुक्यातील अनुसूचित जाती उपप्रकल्पांतर्गत कळझोंडी येथील लाभार्थ्यांना शेतीप्रयोगी निविष्ठांचे मोफत वितरण करण्यात आले. यामध्ये नारळ, काळीमिरी, जायफळ, दालचिनी, सुपारी रोपे, गांडूळ खत आदीचा समावेश होता.
भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातर्फे केंद्र सरकार पुरस्कृत अखिल भारतीय समन्वित ताडमाड संशोधन प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपप्रकल्प योजना राबवली जाते. या अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांना शेतीपयोगी वेगवेगळी साधनसामुग्री पुरवली जाते. या योजनेचा फायदा लाभार्थी शेतकऱ्यांना होण्यासाठी नारळ संशोधन केंद्राचे कृषीविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातील कळझोडींतील ४० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० नारळ रोपे, ५ काळीमिरी रोगे, ३ जायफळ कलमे, ४ दालचिनी कलमे, सुपारी रोपे, ५ किलो गांडुळखत, ३ लिटर व्हर्मिवॉश आदी निविष्ठा साहित्य मोफत वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच दीप्ती वीर, उपरसरपंच प्रकाश पवार व तालुका कृषि अधिकारी पांडुरंग भोये उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. किरण मालशे, संशोधन अधिकारी डॉ. सुनील गवाळे यांनी मसाला पिके लागवड तंत्रज्ञान व किटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी नारळ व आंतरपिकाचे कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसनही केले. या वेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी विनायक आवरे उपस्थित होते.