दाभोळ-सागरी महामार्ग रखडला, पर्यटन उद्योग थांबला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-सागरी महामार्ग रखडला, पर्यटन उद्योग थांबला
दाभोळ-सागरी महामार्ग रखडला, पर्यटन उद्योग थांबला

दाभोळ-सागरी महामार्ग रखडला, पर्यटन उद्योग थांबला

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२९p१६.jpg-KOP२२L७१८३६ मंडणगड ः बाणकोट-बांगमांडला पुलाचे काम अर्धवट आहे.
-rat२९p१५.jpg-KOP२२L७१८३५ सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत येतात.
-------------

सागरी महामार्ग रखडला, पर्यटन थांबले
दापोली, मंडणगडण तालुक्याला फटका ; तीन पूलांचे काम पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत
दाभोळ, ता. २९ ः मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्गही रखडल्याने कोकणचा मुख्य आधार बनू पाहत असलेला पर्यटन उद्योग अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही. दापोली-मंडणगडमधील बाणकोट, केळशी खाडी पूल पूर्णत्वाच्या, तर दाभोळ खाडीवरील पूल मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याने दापोलीतील पर्यटन उद्योगाने अद्याप टॉप गिअर टाकलेला नाही. हा महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता येथील पर्यटन उद्योगाचे चित्र अधिक सुखावह दिसले असते.

सध्या दापोली तालुका पर्यटन उद्योग बहरला पूर्वी गोव्याला जाणारे पर्यटक दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती देतांना दिसत आहेत. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगाने कात टाकली असून पूर्वी मर्यादित गावांमध्येच होणारी न्याहारी निवास आणि रिसॉर्टची व्यवस्था आता अनेक किनाऱ्यांवर विस्तारली आहे. पर्यटकांच्या वाढत्या आलेखामुळे काही वर्षातच येथे स्थानिक आणि परजिल्ह्यातील भांडवलदारांनीही मोठमोठे रिसॉर्ट बांधले आहेत. सध्या ताजे मासे आणि स्वच्छ किनारे हेच येथील पर्यटनाचे प्रमुख आधार राहिले आहेत; मात्र याच जोडीला येथील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि अंतर्गत भागातील कृषी पर्यटनस्थळेही पर्यटकांना आकर्षित करू लागल्याने स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला आहे. सागरी महामार्गामुळे येथील पर्यटन उद्योग अधिकच बहरण्याची आशा बाळगून असलेल्या येथील जनतेची बाणकोट, केळशी आणि दाभोळ खाड्यांवरील रखडलेल्या पुलांमुळे निराशा झाली आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवून सागरी महामार्गाचे महाराष्ट्रातील रखडलेले पूल आणि रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

चौकट
महाराष्ट्र वगळता महामार्गाचे काम पूर्ण

मुंबई-गोवा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या पाच राज्यांतून जातो. एकूण २ हजार १५० किमी लांबीच्या या महामार्गाचे काम महाराष्ट्र वगळता चारही राज्यांनी जलद गतीने पूर्ण केले आहे. कोकणातून जाणारा हा महामार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी किनारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तरी आता हिवाळी अधिवेशनात यावर आवाज उठवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------
कोट
रस्ते मार्गाच्या विकासाच्या प्रक्रियेत बाणकोट-बागमांडला सागरी सेतू दुर्लक्षित आहे. मंडणगड, दापोलीसह कोकणाच्या पर्यटन विकासात महत्वाची भूमिका ठरू शकणारा हा पूल अपूर्णावस्थेत असून दरम्यानच्या काळात तीन सरकार होऊन गेली तरीही तो पूर्ण झालेला नाही. व्यापार उदमवाढीसाठी खाडीवर असलेला हा पूल ही तालुक्यासह कोकणाची पायाभूत म्हणावी, अशी गरज आहे. ती अग्रक्रमाने सोडविणे अत्यावश्यक आहे.
- विजय ऐनेकर, सामाजिक कार्यकर्ते, मंडणगड