प्रधानमंत्री सडक योजनेतून सावंतवाडीत पाच रस्ते मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री सडक योजनेतून
सावंतवाडीत पाच रस्ते मंजूर
प्रधानमंत्री सडक योजनेतून सावंतवाडीत पाच रस्ते मंजूर

प्रधानमंत्री सडक योजनेतून सावंतवाडीत पाच रस्ते मंजूर

sakal_logo
By

प्रधानमंत्री सडक योजनेतून
सावंतवाडीत पाच रस्ते मंजूर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः तालुक्यात प्रधानमंत्री सडक योजनेतून खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून २५ किलोमीटरचे पाच रस्ते मंजूर झाले आहेत. प्रामुख्याने इन्सुली गावात महत्त्वाचे दोन रस्ते मंजूर झाले आहेत, अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.
खासदार राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांसाठी पंतप्रधान सडक योजनेतून शिफारस केली होती. त्यात सावंतवाडी तालुक्यातील पाच कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील २५ किलोमीटर रस्त्यांची कामे होतील, असा विश्वास राऊळ यांनी व्यक्त केला. इन्सुली गावातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांना यामध्ये मंजुरी मिळाली आहे. त्यात इन्सुली-क्षेत्रफळ-वेत्ये-सोनुर्ली रस्ता (३.१६५ किमी), निगुडे-पिटीलवाडी सावंतटेंब कोंडवाडा एक्साईज दलितवाडी रस्ता (५.१०५ किमी), याशिवाय पारपोली देवसू ओवळीये कलबिंस्त (५.१ किमी, तिरोडा सदानंद मठ गुळदुवे (५.४५ किमी), बांदा बांदेश्वर मंदिर सटमट डिंगणे रस्ता (५.१०५ किमी) आदी कामे पंतप्रधान सडक योजनेतून खासदार राऊत यांच्या शिफारशीनुसार मंजूर झाली आहेत, अशी माहिती राऊळ यांनी दिली.