स्थानेश्वर मंदिरात रंगला पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानेश्वर मंदिरात रंगला पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा
स्थानेश्वर मंदिरात रंगला पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा

स्थानेश्वर मंदिरात रंगला पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा

sakal_logo
By

rat२९२८.txt

(पान २ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat२९p२७.jpg
७१८८८
ः राजापूर ः श्री स्थानेश्‍वर.
-rat२९p२८.jpg ः
७१८८९
रंगलेला पालखी भेट सोहळा.
-rat२९p२९.jpg ः
७१९०२
मंदिरात विसावलेल्या पालख्या.
---------
स्थानेश्वर मंदिरात पाच पालख्यांच्या भेटीचा सोहळा

प्रिंदावणमध्ये उत्सव ; गुराख्यांना लागला होता स्थानाचा शोध

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः तालुक्यातील प्रिंदावण येथील डोंगरमाथ्यावरील श्री स्थानेश्‍वर मंदिरामध्ये पालख्यांच्या भेटीचा सोहळा उत्साहात झाला. ढोल-ताशाच्या गजरामध्ये रंगलेल्या पालखी भेट सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी भाविकांनी साधली.
तालुक्यातील प्रिंदावण गावामध्ये उंच डोंगरावर श्री स्थानेश्वर हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. गाईगुरांचे वास्तव्य या परिसरात कायम असल्याने गुराख्यांना या जागृत स्थानाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. पुढे या देवस्थानची शेजवलकर कुटुंबीयांनी पूजाअर्चा सुरू केली. यानंतर ग्रामस्थांच्या मान्यतेसह सहकार्याने या ठिकाणी पाच पालख्यांचा भेट सोहळा गेली काही वर्षे सुरू आहे. ही परंपरा शेजवलकर कुटुंबीयांनी सुरू ठेवली आहे. त्यामध्ये तळेखाजणची ब्रह्मदेव-दत्तगुरूंची पालखी, टेंबावरची दत्तगुरूंची पालखी, बांदिवडे येथील भराडी देवीची पालखी, शेजवलीची निनाई देवीची पालखी, उपळे गावची महालक्ष्मी देवीची पालखी आदी विविध गावच्या पालख्या ढोलताशांच्या गजरात या ठिकाणी येतात. त्यांच्यासमवेत भगवी निशाणे हाती घेऊन गावकरी, भाविकही मोठ्या संख्येने दाखल झाले. या वेळी ढोलताशांचे वाद्य आणि जयघोषामध्ये पालख्यांच्या भेटीचा आनंददायी सोहळा रंगला. तत्पूर्वी, संगम आणि आनंद शेजवलकर यांच्या हस्ते शेजवलकर कुटुंबीय, मानकरी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी श्री स्थानेश्वरची पूजा, रूद्राभिषेक, आरती आणि नैवेद्य आदी धार्मिक विधी झाले.