खेड-भरणे मार्गावर स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-भरणे मार्गावर स्वच्छता अभियान
खेड-भरणे मार्गावर स्वच्छता अभियान

खेड-भरणे मार्गावर स्वच्छता अभियान

sakal_logo
By

rat२९३७.txt

(पान २ साठी)

खेड-भरणे मार्गावर स्वच्छता अभियान

श्री सदस्यांचे श्रमदान ; २२६ टन कचरा जमवला

खेड, ता. २९ ः डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने खेड-भरणे मार्गावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सकाळी ७ वाजल्यापासून शेकडो श्री सदस्यांनी नियोजनबद्ध या मार्गाच्या दुतर्फा स्वच्छता केली.
खेड-भरणे मार्गावरील खेड शहर, शिवनेरी नगर ते भरणेनाका या दोन किमी परिसरात स्वयंस्फूर्तीने स्वच्छता करण्यात आली. या मार्गावर जवळपास २२६ टन एवढा जमा झालेला कचरा ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या साह्याने डम्पिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकण्यात आला. शेकडो श्री सदस्यांनी नियोजनपद्धतीने राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे अवघ्या काही तासात शहराची तसेच खेड भरणे मार्गावरील स्वच्छता करण्यात आली. हे अभियान प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.