
राजापुरातील गाळ उपशाचा 4 जानेवारीला प्रारंभ
rat२९४०.txt
(पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat२९p३४.jpg-
७१९०९
राजापूर ः गाळ उपशाच्या कामाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीला उपस्थित प्रांताधिकारी वैशाली माने, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, नाम फाउंडेशनचे समीर जानवलकर, राजेश देशपांडे, महेश शिवलकर, नरेंद्र मोहिते आदी.
------
राजापुरातील गाळ उपशाचा ४ जानेवारीला प्रारंभ
राजापूर, ता. २९ ः पालकमंत्री उदय सामंत यांनी नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जलसंपदा विभागातर्फे गाळ उपशाला सुरवात झालेली आहे. असे असताना आता नाम फाउंडेशन आणि लोकसहभागातून होणाऱ्या गाळ उपशाच्या कार्यक्रमाचा बुधवारी (ता. ४) आरंभ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता कोदवली नदीपात्रामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर चिपळूणमधील घरकुलांच्या लोकार्पणासाठी येणारे अभिनेते नाना पाटेकर हे देखील राजापूरला भेट देऊन कामाची पाहणी करण्याची शक्यता आहे.
कोदवली नदीतील आयटीआयपासूनच्या गाळ उपसा अभियानाच्या नियोजनासाठी प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या दालनात आज बैठक झाली. या वेळी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, चिपळूणमधील नाम फाउंडेशनचे पदाधिकारी समीर जानवलकर आणि राजेश्वर देशपांडे, महेश शिवलकर, नरेंद्र मोहिते आदी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये प्रांताधिकारी श्रीमती माने, तहसीलदार जाधव, मुख्याधिकारी भोसले यांचे योगदान महत्वाचे राहिले. त्यांना राजापूरकरांनी धन्यवाद दिले असल्याचे अभियानाकरिता स्थापन करण्यात आलेल्या लोकसमितीतील सदस्य महेश शिवलकर यांनी सांगितले.