
संक्षिप्त-किनारपट्टी भागात पुन्हा उष्णतेत वाढ
संक्षिप्त
किनारपट्टी भागात
पुन्हा उष्णतेत वाढ
देवगड ः तालुक्याच्या किनारपट्टी भागात पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. आकाशात अधूनमधून ढग जमा होतात. त्यामुळे अवकाळी पाऊस कोसळण्याची लक्षणे मानली जात आहेत. मध्यंतरी वातावरणात चांगलाच गारठा पसरला असताना आता पुन्हा वातावरण बदलले आहे. काल (ता. २८) रात्रीपासून गारवा कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे. आज दिवसभर उष्णतेत वाढ झाली होती. ढगाळ वातावरण बनले होते. त्यामुळे पावसाची लक्षणे दिसत होती.
‘पीडितांना तत्काळ
अर्थसहाय्य करा’
सिंधुदुर्गनगरी ः पीडितांना लवकरात लवकर अर्थसहाय्य द्यावे, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रभारी सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी सर्वांचे स्वागत करून विषय वाचन केले. बैठकीत मागील इतिवृत्ताचे वाचन करून मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अंतर्गत जानेवारी 1995 ते 28 डिसेंबरअखेर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच पीडित लाभार्थ्यास देय अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीस समाज कल्याण कार्यालयाचे पोलिस निरीक्षक एस. बी. गावडे उपस्थित होत्या.