
खेड ः ''सकाळ''च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
फोटो ओळी
- rat२९p४१.jpg ः KOP२२L७१९२९
खेड ः ''सकाळ''च्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना प्रांताधिकारी जयश्री मोरे आणि मान्यवर .
--------
''सकाळ''च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
खेड, ता. २९ ः ''सकाळ''च्या २०२३ या वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा खेड येथे झाला. गुरुवारी (ता. २९) ''सकाळ'' रत्नागिरी आवृत्तींच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खेडच्या प्रांताधिकारी जयश्री मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुरली मनोहर नागरी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष संजय मोदी, कासारे डेव्हलपर्सचे दयानंद कासारे, उद्योजक रमेश चव्हाण, प्रदीप चव्हाण, संदेश चव्हाण, प्रफुल्ल बामणे उपस्थित होते. ''सकाळ''च्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात. ''सकाळ''चे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात चांगले योगदान असून, ''सकाळ''च्या उपक्रमांची अनेकांनी स्फूर्ती घेणे आवश्यक आहे, असे मत प्रांताधिकारी मोरे यांनी व्यक्त केले. संजय मोदी यांनी ''सकाळ'' च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील ''सकाळ''च्या वाचकांना ही दिनदर्शिका अंकासोबत भेट देण्यात आली आहे.