''कुडाळ लायन्स''चे उपक्रम प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''कुडाळ लायन्स''चे उपक्रम प्रेरणादायी
''कुडाळ लायन्स''चे उपक्रम प्रेरणादायी

''कुडाळ लायन्स''चे उपक्रम प्रेरणादायी

sakal_logo
By

swt२९२८.jpg
71954
कुडाळः सिंधुलायन्स फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, प्रांतपाल कापसे, तहसीलदार अमोल पाठक, सुनील सौदागर, सागर तेली, आफ्रीन करोल, अॅड. अमोल सामंत आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

‘कुडाळ लायन्स’चे उपक्रम प्रेरणादायी
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीः ‘ऑटो-एक्स्पो’ महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः पर्यटनाला चालना देणारा हा लायन्सचा फेस्टिव्हल आहे. या सेवाभावी संस्थेने सर्वप्रथम सुरू केलेला हा महोत्सव निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ''ऑटो-एक्स्पो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल'' या महोत्सवाला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर आज सायंकाळी सुरुवात झाली. गुलाबी थंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल, ऑटो एक्स्पो विविध खाद्यसंस्कृतीच्या स्टॉलने या फेस्टिव्हलमध्ये रंगत आली.
सिंधु लायन्स फेस्टिव्हलचा प्रारंभ कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने झाली. उद्घाटन लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डी १ चे प्रांतपाल एम.के.एफ. लायन राजशेखर कापसे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सारस्वत को. ऑ. बँक लि. संचालक सीए सुनील सौदागार, कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लायन्स पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल सीए अजित पाठक, लायन्स अध्यक्ष अॅड. समीर कुलकर्णी, झोन चेअरमन सीए सागर तेली, श्रीनिवास नाईक, लायन्स संकुल अध्यक्ष अॅड. अमोल सामंत, महोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, श्रीमती कापसे, आनंद बांदिवडेकर, संजीव प्रभू, काका कुडाळकर, नयन बांदेकर, डॉ. श्रुती सामंत, डॉ. दीपाली काजरेकर, तेजस्विनी वैद्य, जीवन बांदेकर, अनंत शिंदे, अस्मिता बांदेकर, मेघा सुकी, डॉ. चेतना चुबे, जी. दत्ताराम, प्रकाश नेरुरकर, स्नेहा नाईक, श्रध्दा खानोलकर, सीए जयंती कुलकर्णी, डॉ. अमोघ चुबे, शोभा माने, अॅड. शेखर वैद्य, देविका बांदेकर, लायन्स पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महोत्सवात सिंधुदुर्गसह पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील एकूण ८७ स्टॉल सहभागी झाले आहेत. उद्घाटनानंतर ''हास्यकल्लोळ'' विनोदी स्किट स्पर्धा, लायन्स गीत नजराणा आदी कार्यक्रम झाले. मान्यवरांनी अनेक स्टॉलबरोबरच जी. डी. आर्ट पदवी परीक्षेत दिव्यांगामधून राज्यात प्रथम आलेली पूजा धुरी हिच्या पेंटींग स्टॉलची पाहणी केली. हा स्टॉल लायन्स क्लब ऑफ कुडाळ यांनी तिला मोफत स्वरुपात दिला आहे. कुडाळ हायस्कूलचे १९८८ चे दहावीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ''मित्रांगण-एक मैत्रेय स्पंदन'' या संस्थेच्या माध्यमातून तिला सहकार्य केले आहे. सूत्रसंचालन स्नेहा नाईक यांनी केले.

चौकट
आज नृत्य कलाविष्कार
महोत्सवात आज (ता. ३०) भारतीय शास्त्रीय, लोक नृत्यासोबत पश्चिमी नृत्य कलेचा आविष्कार कार्यक्रम होणार आहे. नृत्यासोबत संगीत-गाण्यांचे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी (ता. ३१) पुणे येथील प्रसिद्ध सिनेतारका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत व त्यांच्या टीमचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.