रत्नागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी

sakal_logo
By

कोटमधील सरपंचांच्या मताने नारकर उपसरपंच

लांजा तालुका ; सहा ठिकाणी झाली निवडणूक, १३ उपसरपंच बिनविरोध

लांजा, ता. २९ः तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी आज (ता. २९) निवडणूका झाल्या. यापैकी तेरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बिनविरोध निवडून आले. उर्वरित सहा ग्रामपंचायतींमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज आल्याने या ठिकाणी उपसरपंच पदासाठी लढती झाल्या. कोट ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदासाठी समसमान मते पडल्याने या ठिकाणी सरपंचांचे मत निर्णायक ठरले.
बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच असे ः आरगांव- स्वानंद रघुनाथ कदम, कुरचुंब- अनिल सोना सुवारे, कुरणे- दिलीप जयराम पांचाळ, तळवडे- प्रसाद दयानंद ढेपे, रूण- रमेश सदू जाधव, कोंडगे- पुंडलिक विठोबा बेर्डे, खावडी- विघ्नेश नानू गुरव, वेरळ- शरद चरकरी, पुनस- मनोहर तुकाराम कदम, वाकेड- गौरी सचिन शेट्ये, वेरवली खुर्द- सूरज सुरेश कुडतडकर, भडे- संजना महेश बंडबे, खाणवली-प्रदीप सखाराम गार्डी.

निवसर ग्रामपंचायतीत इम्रान इब्राहिम पावसकर हे पाच विरुद्ध चार मतांनी विजय झाले. कोट ग्रामपंचायतीत उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. परंतू मतदानावेळी समसमान मते पडल्याने सरपंचांनी दिलेल्या निर्णायक मताच्या आधारे रवींद्र विष्णू नारकर यांची निवड झाली आहे. सालपे येथे पांडुरंग गंगाराम साळुंखे हे उपसरपंचपदी ७ विरुद्ध ३ मतांनी विजयी झाले. आदवे येथे पूजा संदीप गुरव या ७ विरुद्ध ३ मतांनी उपसरपंचपदी विजयी झाले. बेनी बुद्रुक येथे उपसरपंचपदासाठी २ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये अशोक रामचंद्र कोंडस्कर हे उपसरपंचपदी ६ विरुद्ध २ मतांनी विजयी झाले. वाघ्रट येथे नीलेश अशोक पाष्टे हे उपसरपंचपदी ४ विरुद्ध ३ मतांनी विजयी झाले.