
-इये साहित्याचिये नगरी
rat३०१४.txt
(२४ डिसेंबर टुडे पान तीन)
(टुडे पान २ साठी, सदर)
इये साहित्याचिये नगरी.............लोगो
फोटो ओळी
-rat३०p९.jpg ः
७२०४२
प्रकाश देशपांडे
-rat३०p३.jpg ः
७२०३६
दुर्गाबार्इ भागवत
---
तेजःशलाका दुर्गाबार्इ भागवत
१९७५ ला आणीबाणी आली. सुशासनाच्या नावाखाली प्रचंड दडपशाही सुरू झाली. ज्यांनी समाजाला दिशा द्यायची ती साहित्यिक आणि कलावंत मंडळी आपल्या मठीत मूकपणे बसून होती. त्या वेळी रणचंडीचा अवतार घेऊन दडपशाहीवर आसूड ज्यांनी ओढला त्या दुर्गाबार्इ भागवत.
प्रसंग आहे १९७५ ला कराडला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा. दुर्गाबार्इ भागवत संमेलनाध्यक्ष होत्या. कराड हे स्व. यशवंतराव चव्हाण यांचे गाव. इथेच त्यांची जडणघडण झाली. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी असू नयेत, असे दुर्गाबाईंनी सांगितल्यामुळे सुसंस्कृत यशवंतराव श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत बसले होते. संमेलनाचे पूर्वाध्यक्ष म्हणून पु. ल. देशपांडे यांनी आपल्या भाषणाला सर्वप्रथम प्रारंभ केला. दुर्गाबाईंनी पुलंच्या समोरचा ध्वनिक्षेपक हातात घेतला आणि सांगितले, ‘लोकनायक जयप्रकाश नारायण अत्यवस्थ असून इस्पितळात आहेत. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून आपण सारेजण उभे राहून प्रार्थना करूया.’ जमलेला प्रचंड जनसमुदाय क्षणार्धात उभा राहिला अगदी यशवंतरावांच्यासह. सर्वांना जायचा तो संदेश गेला.
संमेलन संपले आणि दुर्गाबाईंनी आणीबाणी विरोधात व्याख्याने द्यायला आणि लेख लिहायला सुरवात केली. अखेर त्यांना कारावासात डांबण्यात आले. शांतपणे त्यांनी कारावास भोगला. तिथे शिक्षा झालेल्या महिलांकडून त्या गोधडी शिवायला शिकल्या. दुर्गा नारायण भागवत १० फेबुवारी १९१० ला इंदूरला जन्मल्या. मूळ घराणे राजापूर तालुक्यातील कशेळीचे. थोर विचारवंत आणि बहुजनांचे पाठिराखे राजारामशास्त्री भागवत दुर्गाबाईंचे आजोबा. घराणे पुरोगामी विचारांचे. बाईंचे वडील शास्त्रज्ञ होते. दुर्गाबाईंच्या भगिनी कमलाबार्इ सोहोनी या पहिल्या महिला शास्त्रज्ञ. दुर्गाबाईंनी महाविद्यालयात शिकत असताना स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. पुढे १९३२ ला संस्कृत विषय घेऊन प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. ३५ ला त्यांनी ‘प्राचीन बौद्ध न्यायशास्त्र’ या विषयावर प्रबंध लिहून एमएची पदवी प्राप्त केली. दुर्गाबाईंनी पीएचडीसाठी विषय निवडला. ‘मध्यप्रांतातील हिंदू आणि वन्यजमातींच्या संस्कृतीचा संयोग’ या अभ्यासासाठी त्या मध्यभारतात प्रवास करत असताना विषारी कंद खाण्यात आल्याने आजारी होऊन परत आल्या. त्यांचे मार्गदर्शक होते डॉ. गोविंद स. घुर्ये. दुर्गाबाईंनी अधिक संशोधन करावे असे त्यांचे मत होते. अखेर दुर्गाबार्इंनी पीएचडीचा प्रबंध सोडला. त्यांना पदवी मिळाली नाही; मात्र त्यांनी या विषयावर केलेल्या संशोधनावरील लेख परदेशात प्रसिद्ध झाले. लोकसाहित्य आणि मानववंशशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय होता. पीएचडीच्या संशोधनातून त्यांना लोकसाहित्य आणि लोककथांचे आकर्षण निर्माण झाले. लोकसाहित्य हे दिशा उल्लंघून विश्वव्यापी असते़. भारतीय लोककथा जरी परंपरेने घराघरातून सांगितल्या जात होत्या तरी त्यांचे संकलन प्रायः पाश्चात्य संशोधकांनी संकलित केलेले दिसून येते. दुर्गाबाईंनी ज्या लोककथा पाश्चात्य संशोधकांनी संकलित केल्या त्या मराठीत आणल्या. उत्तरप्रदेश, गुजरात, डांग, तमिळ, दख्खन, पंजाबी, बंगाली, मध्यप्रदेश, बुंदेलखांड, संताळ इ. भागातील लोककथांची पुस्तके प्रकाशित केली. बाईंनी खूप भ्रमंती केली. जे जे पाहिले ते ते टिपलं. त्यांनी आपल्या बालआयुष्यावर ‘लहानी’ म्हणून एक पुस्तक लिहिलेय. त्या पुस्तकात ‘सर्कस आणि मी’ या लेखात बालवयात सर्कसचे अद्भुत विश्वाचे वाटणारे आकर्षण व्यक्त केलंय. दुर्गाबार्इंनाही सर्कस आवडली. सर्कशीतल्याप्रमाणे आपणही हे शक्तीप्रदर्शन करणारे प्रयोग करावे असे वाटले. ते करताना खरचटलं, कानाला दुखापत झाली. हे वर्णन करून लेखाच्या शेवटी त्या लिहितात, ‘पुढे माझे वाचन वाढले इतके की मला बुद्धीच्या कसरतीपुढे शरीराची कसरत गौण वाटू लागली. सर्कसची मोहिनी उतरली. आपण खूप हिंडावे मेरू पर्वत ओलांडावा.. मी सातपुड्याची जंगले तुडवली. सर्कससाठी ऐवजी संशोधक झाले.’ पुढे दुर्गाबार्इ संशोधनात रमल्या. एमएचा अभ्यास करताना प्राचीन बौद्ध वाङ्मयचा परिचय झाला होता. बाईंनी पाली भाषा अवगत होती. बौद्धदर्शनाचे वाङ्मय पाली भाषेत आहे. ‘जातक’ हा बौद्धधर्म ग्रंथ. या जातक कथांच्या मध्यमातून समाजाला नीतीमत्तेची शिकवण दिली आहे. दुर्गाबाईंनी सिद्धार्थ जातकचे सात खंड प्रकाशित केले.
दुर्गाबाईंचे ‘पैस’, ‘ऋतुचक्र’, ‘व्यासपर्व’, ’भावमुद्रा‘ हे ग्रंथ म्हणजे शारदेचिया गळा घातलेली सुवर्णाची लखलखित पाने होत. ‘पैस’ या ललितलेखांच्या संग्रहाला १९७१ ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. नेवासे येथे ज्या खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या पैसाच्या खांबानिमित्ताने दुर्गाबाईंनी ज्ञानदेवांचे जीवन त्यांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर बाईंनी केलेले भाष्य म्हणजे व्यासपर्व. आणीबाणीच्या कटू अनुभवांवर त्यांची ‘शासन साहित्यिक आणि बांधिलकी’, ‘जनतेचा सवाल’ अशी वैचारिक चालना देणारी त्यांच्या भाषणांचे संकलन दुर्गाबाईंच्या असलेली पुस्तके. दुर्गाबाईंच्या पुस्तकांची संख्या शंभरच्या आसपास आहे. त्या निर्भिड आणि स्पष्ट वक्त्या होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल त्यांना नितांत आदर होता. त्यांनी सातत्याने दलित लेखकांच्या लेखनाचे समर्थन केले; मात्र मनुस्मृती जाळणे त्यांना अमान्य होते. यामुळे दलित समाज दुखावला गेला; पण बार्इ आपल्या विचारांशी दृढ राहिल्या.
दुर्गाबाईंना लेखनाबरोबरच पाककलेचीही आवड होती. पाककलेवर त्यांचे ‘खमंग’ नावाचे पुस्तक आहे. भरतकाम, विणकाम, प्राणी आणि वनस्पती जीवन यांचीही त्यांना ओढ होती. आणीबाणी संपल्यानंतर आलेल्या जनता पक्षाच्या शासनाने त्यांनी ‘पन्नश्री’ पुरस्कार स्वीकारावा म्हणून विनंती केली; पण आता आणीबाणी उठली. माझे काम संपले म्हणून त्यांनी ‘पन्नश्री’ पुरस्कार आणि त्याबरोबर ज्ञानपीठ पुरस्कारही नाकारला. साहित्यिकांनी शासनाचे मिंधे असू नये, असे त्यांचे मत होते. दुर्गाबार्इंचे ८ मे २००२ ला निधन झाले. साहित्यविश्वातील एक तीव्र तेजःशलाका निमाली.