फूड फेस्टिव्हल एक मोठी पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फूड फेस्टिव्हल एक मोठी पर्वणी
फूड फेस्टिव्हल एक मोठी पर्वणी

फूड फेस्टिव्हल एक मोठी पर्वणी

sakal_logo
By

72058
कुडाळ ः गणेशवंदना सादर करताना कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत. (छायाचित्र ः अजय सावंत)

फूड फेस्टिव्हल एक मोठी पर्वणी

मनीष दळवी ः लायन्स क्लबच्या कार्याचे कुडाळमध्ये कौतुक

कुडाळ, ता. ३० ः लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आयोजित सिंधु लायन्स ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हल हा महोत्सव जिल्हावासियांसाठी एक मोठी पर्वणी ठरेल. अशाप्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी झाले पाहिजेत. या जिल्ह्याच्या यशस्वी वाटचालीत लायन्स क्लबच्या माध्यमातून सर्वांनी मोठे योगदान द्यावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
श्री. दळवी म्हणाले, ‘‘लायन्स क्लबचे सामाजिक कार्य मोठे आहे. जिल्ह्यात अशाप्रकारचे विविध महोत्सव झाले पाहिजेत. जिल्हावासीयांचे सातत्याने डोळे या महोत्सवाकडे लागलेले असतात. दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे महोत्सव झाला नव्हता. परंतु, यंदा मोठ्या थाटात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे.’’
जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल म्हणाले, ‘‘पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याला साजेसा असा हा महोत्सव आहे. लायन्स क्लब या संस्थेचे समाजकार्य मोठे आहे. त्यांनी जिल्हावासीयांसाठी हा महोत्सव आयोजित केला हे कौतुकास्पद आहे.’’ लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ D१ चे प्रांतपाल एमकेएफ राजशेखर कापसे म्हणाले, ‘‘कुडाळ सिंधुदुर्ग लायन्स क्लब दरवर्षी अशाप्रकारचा महोत्सव भरवते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. या क्लबचे कार्य चांगले असून याबद्दल सर्व टिमचे अभिनंदन करतो.’’ तहसीलदार अमोल पाठक म्हणाले, ‘‘लायन्स क्लबने अशाप्रकारचे उपक्रम यापुढील काळातही राबवावेत.’’ लायन्स संकुल अध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. अजित भणगे म्हणाले, ‘‘येथील संस्कृती, खाद्यसंस्कृती यांची ओळख महोत्सव माध्यमातून मिळावी, पर्यटनाला अधिक चालना मिळावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.’’ लायन्स क्लबचे पदाधिकारी डॉ. विवेक पाटणकर, स्नेहा नाईक, शोभा माने, डॉ. सुशांता कुलकर्णी, डॉ. प्राची तानपुरे यांनी जुनी नवीन वैयक्तिक व समूह गीते सादर केली. त्यांना संगीतसाथ अभिजित माने, सचिन कुडतरकर, बाळकृष्ण नाईक, गौरव पिंगुळकर, अविनाश जाधव यांनी दिली. यावेळी गायक गणेश मेस्त्री, राज आंदुर्लेकर यांनी विविध गीते सादर केली.
--
आज सांस्कृतिक कार्यक्रम
कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने गणेशवंदना केली. स्क्रीट स्पर्धेचे परीक्षण नाट्य दिग्दर्शक अमित देसाई, शरद सावंत यांनी केले. निवेदन निलेश गुरव व अमरेश प्रभू यांनी केले. उद्या (ता.३१) पुणे येथील प्रसिद्ध सिनेतारका लावणीसमाज्ञी अर्चना सावंत व त्यांच्या टीमचा विविध प्रकारच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.