कामगार कल्याणमध्ये तणावमुक्ती कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार कल्याणमध्ये तणावमुक्ती कार्यशाळा
कामगार कल्याणमध्ये तणावमुक्ती कार्यशाळा

कामगार कल्याणमध्ये तणावमुक्ती कार्यशाळा

sakal_logo
By

कामगार कल्याणमध्ये
तणावमुक्ती कार्यशाळा
रत्नागिरीः टिळकआळी येथील योजक फुडस् कंपनीतील कामगारांकरिता प्रशासकीय गतिमानता अंतर्गत ताणतणावमुक्ती कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी कोल्हापूर येथील प्रशिक्षक वक्ते विठ्ठल कौतेकर आणि मानसशास्त्रज्ञ विवेक कौतेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी गुणवंत कामगार संतोष शिंदे उपस्थित होते. केंद्र कामगार कल्याण रत्नागिरी केंद्राचे नागवेकर व महिला कल्याण सहाय्यिका संस्कृती शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. याकरिता श्रीकांत भिडे व बंधू यांचे सहकार्य लाभले. शिंदे यांनीआभार मानले.
--------------
‘हिंदुराज’तर्फे
५ ला पायीवारी
खेड ः हिंदुराज मित्रमंडळाच्यावतीने ५ जानेवारी २०२३ ला भरणे ते कशेडी श्रीस्वामी समर्थ मठापर्यंत पायीवारीचे आयोजन केले आहे. पहाटे ५ वा. पायीवारीला सुरवात होईल. पहाटे ६ वा. श्री स्वामी समर्थ मठात श्रीस्वामींना अभिषेक, ८ वा. स्वामींची आरती, ११ वा. सुसेरी नं. २ येथील भजन, दुपारी १ वा. पायीवारीचे श्रीस्वामी मठात आगमन होईल. महाआरतीनंतर सांगता व महाप्रसाद होईल. अधिक माहितीसाठी सतीश चिकणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले आहे.
---------------
शिक्षक संघ दापोली
शाखेची सभा उत्साहात
गावतळे ः अखिल प्राथमिक शिक्षक संघाच्या दापोली शाखेच्या कार्यकारिणीची सभा दापोलीला झाली. सदर सभेमध्ये शिक्षकांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच नासा/इस्रो भेटीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव करून तालुक्यातील संबंधित विद्यार्थ्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले. अखिल टीचर प्रीमियर लीग २०२३ चे नियोजन करून गतवर्षीप्रमाणे समित्या कायम करण्यात आल्या. अशोक मळेकर यांनी प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये आणि चषक देण्याचे जाहीर केले. यावर्षी प्रथमच सभासदांच्या आग्रहास्तव संघटनेची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष रमाकांत शिगवण, जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, उपाध्यक्ष संभाजी सावंत, तालुकाध्यक्ष विजय फंड, सल्लागार सुनील कारखेले, विलास मालगुंडकर, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.