सागर मोहत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागर मोहत्सव
सागर मोहत्सव

सागर मोहत्सव

sakal_logo
By

rat३०१७F.txt

(टुडे पान २ साठी, सुधारित बातमी)
(टीप- यापूर्वीची बातमी रद्द करून ही सुधारित बातमी घ्यावी, एक नाव रद्द करून एक नाव टाकले आहे.)

सागरी परिसंस्थांच्या जतनासाठी सागर महोत्सव

नंदकुमार पटवर्धन ; दोन टप्प्यांत कार्यक्रम

रत्नागिरी, ता. ३० ः सागरी परिसंस्थांचे मानवी जीवनातील महत्व आणि त्या जतन करण्याच्या उद्देशाने पहिल्या सागर महोत्सवाचे आयोजन केले आहे. आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन व सहकारी संस्थांच्या विद्यमाने हा महोत्सव होणार आहे. यात व्याख्याने, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व पुरस्कारप्राप्त लघुपट, माहितीपटांचे सादरीकरण, वाळूशिल्प पाहण्याची पर्वणी आणि विशेष म्हणजे खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची सफर करता येणार आहे, अशी माहिती आसमंतचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.
१३ व १४ जानेवारी आणि २१ व २२ जानेवारी अशा दोन टप्प्यांत महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारीला सकाळी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात लेखिका व मुंबई आकाशवाणीच्या आरजे दुहिता सोमण खेर यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरीतील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फाउंडेशन या सहयोगी संस्था आयोजित पहिल्या सागर महोत्सवात भरगच्च कार्यक्रम आहेत. यातून विद्यार्थी, किनारपट्टी भागातील रहिवासी व रत्नागिरीकरांमध्ये सागर संरक्षणाबाबत जनजागृती होणार आहे.
सागर महोत्सव १३ व १४ आणि २१ व २२ जानेवारी २०२३ या चार दिवशी होणार आहे. १३ जानेवारीला सकाळी ९ वा. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रमुख पाहुण्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सिंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ९.३० वा. सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे यांचे कासवांचे संवर्धन आणि १०.३० वा. खारफुटी संवर्धनाबाबत लक्ष्मीकांत देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. ११.३० ते १.३० या वेळेत समुद्र व पर्यावरण संवर्धनाविषयक माहितीपट, लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. २.३० ते ४ वाजेपर्यंत या क्षेत्रातील पुरस्कार विजेते माहितीपटांचे सादरीकरण होणार आहे. ४ वा. खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता या विषयावर डॉ. अमृता भावे व्याख्यान देतील.
१४ जानेवारीला सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत माहितीपट दाखवण्यात येतील. १२.३० ला शाश्वत मासेमारी या विषयावर डॉ. केतन चौधरी यांचे व्याख्यान होईल. दुपारी २.३० वा. मानवजातीच्या भविष्यासाठी महासागर या विषयावर डॉ. समीर डामरे, दुपारी ३.३० वा. स्थानिक पक्षी या विषयावर प्रसाद गोखले व विराज आठल्ये यांचे माहितीपूर्ण व्याख्यान होईल. ४ वा. प्रश्नमंजूषा स्पर्धा होईल.


समुद्रकिनारा, खारफुटी सैर
२१ आणि २२ जानेवारीला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये समुद्रकिनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. या वेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. ७ ते ९.३० या वेळेत कर्ला येथील खारफुटी जंगलाची सफर संजीव लिमये व संतोष तोसकर घडवतील तसेच सायंकाळी, दुपारी ३ ते ६ या वेळेत मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे व अमृता भावे घडवतील. प्रत्येकाच्या आवडीनुसार समुद्रकिनारा, खारफुटी या भागात विद्यार्थी, रत्नागिरीकरांना सैर करता येणार आहे. याच कालावधीत देखणी वाळूशिल्पे भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पाहण्याची संधी पर्यटक आणि रत्नागिरीकरांना मिळणार आहे.