पावसमधील कृषी विभागाच्या निवासस्थानाची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसमधील कृषी विभागाच्या निवासस्थानाची दुरवस्था
पावसमधील कृषी विभागाच्या निवासस्थानाची दुरवस्था

पावसमधील कृषी विभागाच्या निवासस्थानाची दुरवस्था

sakal_logo
By

rat30p13.jpg
72070
पावसः येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ पडीक अवस्थेत असलेले कृषी विभागाचे निवासस्थान.
-------------
पावसमधील कृषी विभागाच्या
निवासस्थानाची दुरावस्था
पावस, ता. ३०ः येथे कृषी विभागाचे निवासस्थान असून त्या ठिकाणी कृषी सहाय्यक राहत नसल्याने त्या निवासाची दुरावस्था झाली आहे.
पावस प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या कर्मचारीवर्गाच्या निवासस्थानात शेजारी कृषी विभागाची एक स्वतंत्र इमारत गेली अनेक वर्ष कार्यरत होती. या ठिकाणी पूर्वी कृषी सहाय्यक आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यामुळे त्याला शासकीय निवासस्थानाचा फायदा घेता येत होता; परंतु सध्या ते राहत नसल्यामुळे इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या या शेजारी असलेल्या प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाची मागील वर्षी चांगल्या तऱ्हेने दुरुस्ती केल्यामुळे ते सुस्थितीत आहेत. त्याचबरोबर त्या शेजारी असलेली प्राथमिक आरोग्यकेंद्राची इमारत सुसज्ज होणार आहे. पण कृषी विभागाचे निवासस्थान वापरात नसल्यामुळे पडिक बनले आहे.