
राजापूर-इमेन्स फाउंडेशनला आदर्श संस्थेचा पुरस्कार
rat30p15.jpg
72076
सुग्रीव मुंडे
rat30p16.jpg
72077
शेखर पाध्ये
rat30p17.jpg ः
72078
सिद्धेश सागवेकर
-----------------
इमेन्स फाउंडेशनला आदर्श संस्थेचा पुरस्कार
राजापूर पत्रकार संघ; डॉ. पाध्ये, सागवेकर, मुंडे यांचा होणार गौरव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३०ः पत्रकारिता करत असताना विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवणार्या राजापूर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरवले जात आहे. त्याप्रमाणे यावर्षीच्या राजापूर पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली असून त्यामध्ये इमेन्स फाउंडेशनला आदर्श संस्था पुरस्कार, भू येथील डॉ. शेखर पाध्ये यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार, खरवते येथील युवा शेतकरी सिद्धेश सागवेकर यांना आदर्श शेतकरी, तुळसवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुग्रीव मुंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारीला पत्रकार दिनानिमित्ताने पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. राजापूर नगर वाचनालयामध्ये सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला आमदार डॉ. राजन साळवी, विधान परिषदेच्या माजी सदस्या अॅड. हुस्नबानू खलिफे, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदी उपस्थित राहणार आहेत.
प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षणासोबतच विविध उपक्रम राबवून ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहेत. कोरोनासह अन्य काळामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून देवदूत बनलेले भू येथील डॉ. पाध्ये यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध कारणांमुळे शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष होत असताना खरवते येथील सागवेकर या तरुणाने शेतीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करून सार्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. कृषिक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
इमेन्स फाउंडेशन या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवून त्या द्वारे सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक गरजवंतांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राजापूर पत्रकार संघातर्फे त्यांना आदर्श संस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.