
लांजा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य
rat30p19.jpg
72084
लांजाः बसस्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
-------
लांजा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य
स्वच्छतेकडे दुर्लक्ष ; दुर्गंधीने प्रवासी हैराण
लांजा, ता. ५ः लांजा बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधींमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. एसटीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
मुंबई-गोवा हायवेलगत लांजा बसस्थानक आहे. त्यामुळे एसटीची कायम वर्दळ असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी या बस स्थानकावर असतात. परंतू या बसस्थानकावर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. दिवसेंदिवस लांजा बस स्थानक असुविधेच्या गर्तेत जात आहे. संडास, मुतारीच्या इमारतीची दुरवस्था असून या परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे. स्थानक परिसरातील कचराही साफ केला जात नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगांना आमत्रंण देण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. स्थानकातील अस्वच्छता दूर करावी. बसस्थानकातील कचरा नियमित साफ करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.