दिव्यांग पूजा धुरीच्या कलेची झाली वाहव्वा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग पूजा धुरीच्या
कलेची झाली वाहव्वा
दिव्यांग पूजा धुरीच्या कलेची झाली वाहव्वा

दिव्यांग पूजा धुरीच्या कलेची झाली वाहव्वा

sakal_logo
By

72063
कुडाळ ः दिव्यांग पूजा धुरी हिच्या चित्र प्रदर्शनाला जिल्हा सत्र न्यायाधीश भारुका यांनी भेट देऊन पुजाचे कौतुक केले. (छायाचित्र ः अजय सावंत)

दिव्यांग पूजा धुरीच्या
कलेची झाली वाहव्वा

कुडाळचे चित्र प्रदर्शन; ‘लायन्स’चे सहकार्य

कुडाळ, ता. ३० ः सिंधुदुर्गच्या दिव्यांग पूजा धुरीच्या चित्र प्रदर्शनला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन तिच्या कलेचे भरभरुन कौतुक केले. लायन्स क्लब ऑफ सिंधुदुर्गच्या फेस्टिव्हलमध्ये तिला आपले पहिले चित्रप्रदर्शन भरविण्याची संधी लायन्स या सेवाभावी संस्थेने दिली.
येथील हायस्कूल मैदानावर सुरू असणाऱ्या सिंधू लायन्स महोत्सवात अनेक मान्यवरांनी सर्व स्टॉलना भेटी दिल्या. या स्टॉलमध्ये लक्ष वेधून घेणारा स्टॉल पूजा धुरीचा होता. पूजा ही जी. डी. आर्ट पदवी परिक्षेत दिव्यांगामधून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आली आहे. तिच्या पेटींग स्टॉलची पाहणी मान्यवरांनी केली. हा स्टॉल लायन्स क्लब ऑफ कुडाळ यांनी तिला सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून पूर्णतः मोफत स्वरुपात दिलेला आहे. येथील हायस्कूलचे १९८८ चे दहावीचे काही माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन ‘मित्रांगण-एक मैत्रेय स्पंदन’ नावाची संख्या स्थापन केली आहे. पूजाला या संस्थेने सहकार्य केले आहे. तिच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. स्वतःची आर्ट गॅलरी व स्वतःच प्रदर्शन भरविणे हे तिचे स्वप्न होते. सिंधू लायन्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून तिचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी तिला मिळाली असून तिचे या महोत्सवातील पहिले चित्र प्रदर्शन होय. यावेळी लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ D१ चे प्रांतपाल राजशेखर कापसे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सारस्वत को. ऑ. बँक लि. संचालक सीए सुनील सौदागार, कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफरीन करोल, माजी प्रांतपाल सीए अजित पाठक, माजी संकुल अध्यक्ष अॅड. अजित भणगे, श्रीनिवास नाईक, लायन्स अध्यक्ष अॅड. समीर कुलकर्णी आदी उपस्थित होते.