Thur, Feb 2, 2023

फणसू महाविद्यालयात स्नेहसंमेलन
फणसू महाविद्यालयात स्नेहसंमेलन
Published on : 30 December 2022, 1:06 am
rat30p21.jpg
72100
गावतळेः सायली कदम यांचे स्वागत करताना किशोर शिगवण.
---------
फणसू महाविद्यालयात स्नेहसंमेलन
गावतळे ः दापोली तालुक्यातील फणसू येथील स्वराज्य शिक्षणसंस्थेच्या (कै.) मेजर नारायणराव कदम कला, वाणिज्य कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात झाल्या. माजी आमदार संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली सप्तरंग हस्तलिखिताचे प्रकाशन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. सांस्कृतीक विभाग प्रमुख किशोर शिगवण यांनी स्वराज शिक्षण संस्थेच्या संचालिका सायली कदम यांचे स्वागत केले. यावेळी श्वेता कदम, किशोर सुर्वे, शांताराम राणे, प्रकाश पेठे, राजाराम रसाळ, मुख्याध्यापक रमेश भागणे आदी उपस्थित होते.