
चिपळूण-17 कोटीच्या योजनेतून सावर्डेची पाणी समस्या निकाली
rat३०३०.txt
(पान ५ साठीमेन)
फोटो ओळी
- ratchl३०२.jpg-
७२१२८
चिपळूण ः आमदार शेखर निकम यांचा सत्कार करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी
---
१७ कोटीच्या योजनेतून सावर्डेची पाणी समस्या निकाली
आमदार शेखर निकम ; सावर्डेत आमदार निकम यांचे जंगी स्वागत
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ३० ः गेल्या काही वर्षापासून सावर्डे गावास पाणी पुरवठ्याची समस्या होती. उन्हाळ्याच्या कालावधीत सावर्डेतील काही वाड्यातील ग्रामस्थांना पाणी टंचाईची सामना करावा लागत होता. यासाठी आमदार शेखर निकम यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून १७ कोटीचा निधी मंजूर करून घेतला. नवीन पाणी योजनेमुळे सावर्डेतील पाणी समस्या निकाली निघणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. दरम्यान अधिवेशनानंतर आमदार निकमांचे गावात आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
जलजीवन मिशन अंतर्गत सावर्डे, सावर्डे खुर्द, सावर्डे कासारवाडी पाणी योजनेला १६ कोटी ९६ लाख ६ हजार ८७९ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागपूर अधिवेशनावरून आमदार निकम सावर्डे येथे आले असता सावर्डे ग्रामपंचायत, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती आणि सर्व ग्रामस्थ्यांचा वतीने सावर्डेत सत्कार करण्यात आला. सावर्डेच्या सरपंच समिक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी यांचा हस्ते शाल, श्रीफळ देत त्यांचा सत्कार करण्यात आला. जलजीवन मिशनचे श्री. कुलकर्णी यांचेही स्वागत करण्यात आले.
१७ कोटीच्या योजनेमुळे सावर्डे गावचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटणार असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. या वेळी माजी सभापती पूजा निकम, माजी सभापती विजयराव गुजर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबू चव्हाण, बाळूशेठ मोहिरे, अजित कोकाटे, शरद चव्हाण, विजय बागवे, दत्ताराम उदेग, अंकिता सावंत , समिया मोडक, सावली खसासे, सुप्रिया सावंत, श्रेया सावंत, नेहा मेस्त्री, सीमा गुडेकर, जान्हवी पाटेकर, ग्रामविकास अधिकारी के. डी. पवार, यांच्यासह ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.