निरवडे उपसरपंचपदी अर्जुन पेडणेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरवडे उपसरपंचपदी अर्जुन पेडणेकर
निरवडे उपसरपंचपदी अर्जुन पेडणेकर

निरवडे उपसरपंचपदी अर्जुन पेडणेकर

sakal_logo
By

तळवडेत आठला बागायतदार मेळावा
सावंतवाडी ः सहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव आणि ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने 8 जानेवारी शेतकरी बागायतदार मेळावा आयोजित केला आहे. तळवडे येथील श्री जनता विद्यालय येथे सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील अनुभवी प्रगतशील शेतकरी व बागायतदार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे. या मेळाव्याला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सावंतवाडी संस्थांच्या राणीसाहेब शुभदा देवी भोसले, कुलगुरू संजय सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे प्रमुख बाळासाहेब सावंत, संचालक प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना व बागायतदारांना कृषी विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शक शेती व फळबागायती संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माती परीक्षण व त्याचे महत्त्व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व खत व्यवस्थापन कोकणातील शेतकऱ्यांकरिता मत्स्य शेतीचे विविध पर्याय कोकणातील शेळीपालन व्यवसायातील संधी आंबा व काजू पीक संरक्षण अधिवेशनवरती मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात विशेष म्हणजे कृषी उपयुक्त अवजारे, कीटकनाशके, खते, बी-बियाणे, नर्सरी शेतीशी निगडित उत्पादनांचे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे.