चिपळूण अर्बनच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण अर्बनच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल
चिपळूण अर्बनच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल

चिपळूण अर्बनच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

rat३०२५.txt

(पान ३ साठी)

चिपळूण अर्बनच्या दोन संचालकांवर गुन्हा

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश ; निवडणुकीच्या धामधुमीत भर
सकाळ वृत्तसेवा ः

चिपळूण, ता. ३० ः येथील चिपळूण अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंकेत झालेल्या अपहार प्रकरणातील संशयित आरोपीच्या घरात जाऊन त्याचा लॅपटॉप आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बॅंकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच हा गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
नीलेश आत्माराम भुरण (खेर्डी), दीपक प्रभाकर विखारे (बाजारपेठ), संतोष विजय देसाई (कराड, सध्या खेंड-चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील भुरण व विखारे हे चिपळूण अर्बन बँकेचे संचालक तर देसाई हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याची तक्रार राहुल रमेश सुर्वे (खेर्डी) याने दिली आहे. बॅंकेत काही लाखांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी बॅंकेने सुर्वे याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला अन् त्याला अटकही झाली होती.

पोलिसांनी दिलेली माहिती, ८ ऑगस्टला सायंकाळी भुरण व विखारे हे सुर्वे यांच्या सती येथील घरी गेले. या वेळी घरात त्याची आई व पत्नी होती. त्यांना आम्ही बॅंकेतून आलो आहोत, सुर्वे याने लॅपटॉप मागितला आहे असे खोटे सांगून तो घेऊन गेले. त्यानंतर देसाई यांनी हा लॅपटॉप आपल्याकडे असल्याचे सुर्वे याला सांगितले. त्यामुळे लॅपटॉप घेण्यासाठी सुर्वेने त्याची आई व पत्नीचा विश्वासघात केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्बन बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यातच आता निवडणुकीची धामधूम सुरू असताना दोन संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने येथे आणखीनच खळबळ उडाली आहे.