दाभोळ-वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानाबाबत समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानाबाबत समिती
दाभोळ-वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानाबाबत समिती

दाभोळ-वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानाबाबत समिती

sakal_logo
By

भरपाईसाठी वनविभाग, महसूलकडून समिती
नुकसानीचे मूल्य करणार निश्‍चित; विधानसभेतील लक्षवेधीवर त्वरित निर्णय
दाभोळ, ता. ३०ः राज्यात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस आदी फळझाडे तसेच बांबू व फुलझाडे यांचा मोहोर, फुलोरा, पालवी यांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत असून त्यासाठी दिली जाणारी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी सध्या शासनस्तरावर कार्यपद्धती अस्तित्वात नाही. ती विकसित करण्यासाठी अशा नुकसान झालेल्या प्रकरणांना कारणीभूत ठरणारे वन्यप्राणी, नुकसानीमुळे बाधित होणारे क्षेत्र, फळझाडांचा मोहोर, फुलोरा, पालवीचे वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण या बाबींच्या आधारे फळझाडांच्या नुकसानाचे मूल्य निश्चित करण्याकरिता महसूल व वनविभागाद्वारे एक समिती तयार केली आहे.
दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वन्यप्राण्यांकडून फळझाडांचे नुकसान होत असल्याने कोकणातील शेतकरी त्रस्त झाला असून शासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी लक्षवेधीद्वारे या अधिवेशनात सरकारकडे केली होती. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नासंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती गठित केली जाईल व त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे सरकार नुकसानभरपाई देईल, असे उत्तर झालेल्या चर्चेत दिले होते. अधिवेशन संपण्यापूर्वी शुक्रवारी या समितीसंदर्भात शासन आदेश काढण्यात आला असून, त्यात समितीच्या कार्यकक्षाही ठरवून दिल्या आहेत. शासनाने उचललेल्या या पावलामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. वन्यप्राण्यांमुळे फळझाडांचे नुकसान झाल्यानंतर त्याचे मूल्य निश्चित करण्यासाठी महसूल व वनविभागाद्वारे समिती तयार केली आहे. महसूल व वनविभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली.

चौकट
अशी आहे समिती सदस्य...
महसूल व वनविभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित केली असून आमदार योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम, कृषी विभागाचे आयुक्त, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हे या समितीचे सदस्य असून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.